शकील देशमुख : शिरूर अनंतपाळ
स्मशान भूमीचे नाव देखील घेतले तरी अंगावर काटा येतो.कुणी नाव काढले तरी आपण त्याला गप्प बसायला सांगतो. पण याला अपवाद ठरली आहे, ती शिरूर अनंतपाळ शहरातील लिंगायत स्मशानभूमी. येथे अंत्यसंस्कारासाठी येणा-या प्रत्येक व्यक्तीचे लक्ष येथील सुशोभिकरणाकडे जात असून येथील घरणी नदीचा किनारा त्याकाठी दाटीवाटीने आलेले बांबु चे वृक्ष त्यात वेगवेगळ्या झाडांची मांदियाळी यामुळे येथील वातावरण आल्हाददायक बनले आहे.
गाजर गवतासह जंगली झाडाझुडपामध्ये दिशेनाशी झालेल्या लिंगायत स्मशानभूमीत नगराध्यक्ष प्रतिनिधी गणेश धुमाळे यांनी सर्व सहका-यांच्या साथीने मोठे परिश्रम घेवून त्या ठिकाणी कंपाऊंड वॉल, वॉक वे, पाणी, झाडांची लागवड केली असून त्याचे योग्य प्रकारे संवंर्धन देखील केले आहे. येणा-या काळात नगर पंचायतीच्या माध्यमातून विविध प्रकारचे झाडे लावून स्मशानभुमीचे सुशोभीकरण व या ठिकाणी बसण्यासाठी आल्हाददायक वातावरण होणार आहे.
दरम्यान शहरातील लिंगायत स्मशानभूमीकडे एके काळी भितीच्या नजरेने पाहिले जायचे, पण आज या स्मशानभूमीचे शहराचे नगराध्यक्ष प्रतिनिधी गणेश धुमाळे व सर्व नगरसेवक यांचे अथक प्रयत्न व त्यात लोकांचा सहभाग मिळाल्याने स्मशानभूमीचे शांतीवन झाले आहे. यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे, फूलांची झाडे व दुर्मिळ अशा औषधी वनस्पतीचे झाडे लावण्यात आली असून शांतीवनात पाण्याची व बसण्याची सोय केली असल्याने या स्मशान भूमीचे आज नंदनवन झाले असून यांसह भूमी, वायु, जल, अग्नी व आकाश यांवर आधारीत उपकृम राबवून नगरपंचायत माझी वसुंधरा अभियान राबविण्यास सज्ज झाली आहे.