मातीच्या ढिगा-याखाली दबून तिघांचा मृत्यू

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली. विहिरीच्या कामादरम्यान ढिगा-याखाली दबून वडील आणि दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावात ही घटना घडली. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धानोरा शिवारात विहिरीचे काम सुरू असताना तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये वडील आणि दोन तरुण मुलांचा समावेश आहे. बाजीराव सर्जेराव काकडे (५५ वर्षे), आजिनाथ बाजीराव काकडे (२५ वर्षे) आणि शाम बाजीराव काकडे (२२ वर्षे) अशी तिन्ही मृतांची नावं आहेत. ही घटना ९ मे रोजी रात्री रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. नवरा आणि दोन मुलांच्या मृत्यूमुळे बाजीराव काकडे यांच्या पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

विहिरीचे काम सुरू असताना रात्री विहिरीत पाणी साचले. हे पाणी काढण्यासाठी तिघेही बाप-लेक विहिरीच्या काठावर उभे होते. मात्र माती असल्याने विहीर ढासळली त्यामुळे तिघेही विहिरीत कोसळले. त्यांच्या अंगावर मातीचा ढिगारा पडल्यामुळे तिघेही ढिगा-याखाली दबले. त्यांना स्वत:चा जीव वाचवण्याची संधी देखील मिळाली नाही. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news