शिरूर ताजबंद : वार्ताहर
शेतकरी हा शेतीचा डॉक्टर आहे. शेतक-यांना पीक बघून शेतीला काय द्यायचे आहे किंवा काय बदल करायचे आहेत हे आपोआप समजत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद कृषी महाविद्यालय येथे २००५ ते ०७ या वर्षातील माजी विद्यार्थ्यांच्या स्रेह मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य अनंत बस्तापुरे होते. विचारपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून पंचायत समितीचे सभापती सुरज पाटील, प्रशांत पाटील, ढवळे, माळी, भोसले, बाळू पिनाटे, ताडमे लक्ष्मण, बुद्धभूषण मोरे हे उपस्थित होते.
सहकारमंत्री पाटील म्हणाले की, आपण कृषी महाविद्यालयातून शिक्षण घेऊन आज जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या पदावर काम करीत आहोत आपण जबाबदारीने काम केले पाहिजे आणि सर्वसामान्य शेतक-यांना न्याय देण्याचे काम करावे. त्याचबरोबर शेतीच्या विविध योजना शेतक-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे सहकारमंत्री पाटील म्हणाले. या स्रेह मेळाव्यासाठी डी. एन. शिंदे कृषी सहाय्यक, अमोल बंडे, सुभाष भालेकर, विवेकानंद शिरूरे, गिरी, गयाबाई कबीर, सुनिता सोमवंशी, आरती राठोड विविध विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नितीन गोरे यांनी केले.

