23.3 C
Latur
Friday, February 28, 2025
Homeराष्ट्रीयमार्च ते मेदरम्यान उष्णतेच्या लाटेच्या अस झळा!

मार्च ते मेदरम्यान उष्णतेच्या लाटेच्या अस झळा!

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेच्या अस झळा जाणवू लागल्या. यंदाचा उन्हाळ््यात तीव्र उष्णतेला समोर जावे लागण्याची भीती असताना भारतीय हवामान विभागाने या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली. देशातील अधिकांश भागात मार्च ते मे दरम्यान सामान्यपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मार्च ते मे दरम्यान देशात उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून महाराष्ट्रातही याची झळ पोहोचणार आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

सध्या राज्यासह देशातील विविध भागांत तापमानाची पातळी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ या भागांत उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच देशात उन्हाच्या झळा अनुभवायला मिळाल्या. ऐन थंडीच्या दिवसांत उष्णता वाढल्याने त्याचे संकेत आधीच मिळाले आहेत. आता शनिवारी मार्च महिना उजाडणार आहे. मार्च महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता सामान्यपेक्षा अधिक असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हवामान अभ्यासक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्चच्या सुरुवातीला राज्यातील अंतर्गत भागात २-३ अंशांनी तापमान वाढणार आहे. राज्यभरात तापमानाचा पारा प्रचंड वाढणार असून कोकण, गोव्याच्या तापमानात फारसा बदल होणार नसल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे मार्चच्या पहिल्या आठवड्यात मध्य प्रदेशात ढगाळ आकाश आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम-उत्तर भारतात २ मार्चपासून वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत आहे. त्याचा परिणाम राज्यातही दिसून येत आहे. विशेषत: ४ मार्चपासून इंदूर, ग्वाल्हेर आणि चंबळ भागात काही ठिकाणी हवामान बदलू शकते. याआधी दिवसा आणि रात्रीच्या तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होणार आहे.

फेब्रुवारीपासूनच तीव्रता वाढली
यंदा तापमानाची तीव्रता फेब्रुवारीपासूनच वाढली. खरे तर होळीपासून उष्णतेची तीव्रता वाढते. परंतु फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून राज्यात तापमान अधिक वाढलेले पाहायला मिळाले. त्यामुळे रसवंतीगृह सुरू झाले. तसेच कोल्ड्रिंकलाही मागणी वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता हवामान खात्याने मार्चपासून तापमान सामान्यपेक्षा अधिक राहील, असा अंदाज वर्तवल्याने यंदा उन्हाळा अधिक कडक जाणवण्याची चिन्हे आहेत.

पाणी पातळी घसरणार!
उन्हाची तीव्रता वाढल्यास प्रकल्पांतील पाणी पातळी वेगाने कमी व्हायला सुरुवात होते. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने लहान-मोठे प्रकल्प भरलेले आहेत. परंतु उन्हाची तीव्रता वाढल्यास आपोआप पाणी पातळी कमी होऊ शकते. यातून पुन्हा पाणी टंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता आहे. काही भागांत आतापासूनच टँकरची मागणी सुरू झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR