16.9 C
Latur
Thursday, November 28, 2024
Homeराष्ट्रीयमालदीव पुन्हा संकटात; भारतीय पर्यटकांनी फिरवली पाठ

मालदीव पुन्हा संकटात; भारतीय पर्यटकांनी फिरवली पाठ

भारतीयांसाठी एग्झिट फी वाढवणार १ डिसेंबरपासून निर्णयाची अंमलबजावणी

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून विविध मुद्यांमुळे चर्चेत असलेला मालदीव हा देश अतिशय महागडा आहे. मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक मालदीवला फिरायला जात असतात. पण आता तेथील सरकारच्या एका निर्णयामुळे मालदीवला फिरायला जाण्यापूर्वी १० वेळा विचार करावा लागणार आहे. खरंतर मालदीव सरकार आता एग्झिट फी वाढवणार आहे.

येत्या १ डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे समजते.
एका रिपोर्टनुसार, मालदीवमधून बाहेर पडणा-या लोकांना फ्लाइटमध्ये क्लासनुसार जास्त पैसे भरावे लागणार आहेत. म्हणजेच इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करणा-या व्यक्तील ५० डॉलर भरावे लागणार आहेत, आधी हेच दल ३० डॉलर इतके होते. तर बिझनेस क्लासमधून प्रवास करणा-यांना १२० डॉलर भरावे लागीतल, यापूर्वी त्यांना ६० डॉलर भरावे लागायचे. एवढेच नव्हे तर फर्स्ट क्लासमधून प्रवास करणा-या व्यक्तीला २४० डॉलर्स भरावे लागतील, आधी हा दर ९० डॉलर्स इतका होता. प्रायव्हेट जेटमधून प्रस्थान करणा-यांना तब्बल ४८० डॉलर्स भरावे लागतील, आधी ही किंमत १२० डॉलर्स होती.

विशेष म्हणजे हा टॅक्स मालदीवमधील नव्हे तर बाहेरील लोकांवर लागणार आहे. त्यांचे वय किती किंवा ते किती लांबून आले आहेत, याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. म्हणजे लंडन वरून मालदीवला आलेल्या लोकांनाही तितकाच कर भरावा लागेल जितका दिल्लीहून तेथे गेलेल्या लोकांना भरावा लागणार आहे. मालदीव इनलँड रेव्हेन्यू अथॉरिटीने नोव्हेंबरमध्ये देशाच्या वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या देखभालीसाठी महसूल निर्माण करण्यासाठी कर वाढीची घोषणा केली.

शुल्क एअर लाईनमध्येच जोडले
मेख अशी आहे की काही पर्यटकांना या नव्या फीबद्दल काही माहीतीच नसेल. हे शुल्क एअरलाइन तिकीटांच्या किमतीतच जोडले जाते. याव्यतिरिक्त, मालदीवच्या दिशेने उड्डाण करणा-या स्टार्टअप ऑल-बिझनेस-क्लास एअरलाइनने नवीन कर टाळण्यासाठी ग्राहकांना ३० नोव्हेंबरपूर्वी तिकिटे खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

भारतीयांच्या रागाचा मालदीवला फटका
यावर्षाच्या सुरूवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लक्षद्वीपच्या दौ-यावर गेले होते. त्यांनी तेथील काही फोटो शेअर केले होते. तसेच देशातील नागरिकांनी लक्षद्वीप फिरण्यासाठी आवर्जून जावे असे आवाहनही पंतप्रधानांनी केले होते. मात्र मोदी यांचे हे आवाहन मालदीवला फारसे रुचले नाही आणि अनेक नेत्यांनी वादग्रस्त विधान केली.

लक्षव्दीपला जाणा-यांच्या संख्येत वाढ
मालदीवच्या नेत्यांच्या वक्तव्यानंतर भारतीयांनी त्यावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. दोन्ही देशांमधील संबंधही बिघडले होते. भारतीयांनी बहिष्कार टाकल्याने मालदीवला मोठा धक्का बसला. या काळात मालदीवमध्ये जाणा-या भारतीयांची संख्या कमी झाली आणि लक्षद्वीपला जाणा-यांची संख्या वाढतच गेली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR