पुणे : प्रतिनिधी
येवलेवाडी येथे दुपारी दीड वाजता एका काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने झालेल्या अपघातात दुर्दैवाने चार कामगारांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येवलेवाडी येथे दुपारी दीड वाजता एका काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने पाच कामगार अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती.
अग्निशमन दलाच्या जवानांनी पाचही कामगारांना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु त्या ५ कामगारांपैकी ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर एका कामगारावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.