29.8 C
Latur
Friday, April 11, 2025
Homeमनोरंजन‘मी टू’ प्रकरणी नाना पाटेकरांना दिलासा; तनुश्री दत्ताची याचिका फेटाळली

‘मी टू’ प्रकरणी नाना पाटेकरांना दिलासा; तनुश्री दत्ताची याचिका फेटाळली

मुंबई : वृत्तसंस्था
अभिनेत्री तनुश्री दत्ताने २०१८ मध्ये नाना पाटेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. २००८ मध्ये एका चित्रपटाचे चित्रीकरण करताना आक्षेपार्ह कृत्य केल्याचा आरोप तिने केला होता.

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात अभिनेत्री तनुश्री दत्ताची तक्रार कायद्याच्या विहित मुदतीत दाखल न झाल्याने त्याचा लाभ नाना पाटेकर यांना झाला आहे. मुंबईतील अंधेरी येथील महानगर दंडाधिकारी यांनी तनुश्री दत्ताच्या तक्रारीची विलंबामुळे दखल घेता येत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्याचवेळी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात दाखल केलेला बी समरी अहवाल देखील न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने २०१८ मध्ये नाना पाटेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. २००८ मध्ये एका चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना पाटेकर यांनी आक्षेपार्ह कृत्य केल्याचा आरोप तिने केला. तिच्या या आरोपानंतर देशभरात ‘मी टू’ची चळवळ सुरू झाली. दरम्यान, अंधेरी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. व्ही. बन्सल यांनी या प्रकरणाचा निकाल दिला आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेली तक्रार कथित घटनेच्या तीन वर्षांत दाखल करणे गरजेचे होते. मात्र, २३ मार्च २००८ रोजी घडलेल्या घटनेची तक्रार मुदत संपल्यानंतर सात वर्षांनंतर म्हणजे २०१८ मध्ये करण्यात आली. त्यामुळे त्या तक्रारीची दखल घेता येत नाही, असे महानगर दंडाधिकारी यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR