शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
चंदिगड युनिव्हर्सिटी मोहाली, पंजाब येथे झालेल्या आंतर विद्यापीठ स्पर्धेत मुंतजीर मकबूल सरनौबतने कुस्तीत फ्रीस्टाईल ८६ किलो वजनी गट वेष्ट झोन स्पर्धत सुवर्ण पदक पटकावले आहे.तसेच प्रदीप प्रेमनाथ गोरे याची फ्रीस्टाईल वजनी गटात राष्ट्रीय स्पर्धेसाठी गणेश राजेंद्र साळूंके याची ग्रीको रोमन ८७ किलो वजनी गटात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तीन ही खेळाडूंच्या या यशाबद्दल शिवनेरी महाविद्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ साऊथ वेष्ट झोन कुस्ती स्पर्धेसाठी चंदीगढ विद्यापीठ मोहाली पंजाब येथे पाठविण्यात आला. यात विद्यापीठाच्या कुस्ती संघात शिवनेरी महाविद्यालयाचे तीन खेळाडू नेतृत्व करीत आहेत. तीनही खेळाडूंनी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत उत्तुंग भरारी घेऊन शिरूर अनंतपाळ तालुक्याचे नाव देशपातळीवर नेले आहे. या स्पर्धेत विद्यापीठासाठी पदक प्राप्त करण्यासाठी मल्लांची चुरशीच्या लढती झाल्या. शिवनेरी महाविद्यालयातील मुंतजीर मकबूल सरनौबत याने कुस्तीमध्ये फ्रीस्टाईल ८६ किलो वजनी गट वेष्ट झोन स्पर्धत सुवर्ण पदक पटकावले. प्रदीप प्रेमनाथ गोरे याने फ्रीस्टाईल वजनी गटात राष्ट्रीय स्पर्धेत आपला प्रवेश पक्का केला तर गणेश राजेंद्र साळूंके यानेही ग्रीको रोमन ८७ किलो वजनी गटात राष्ट्रीय स्पर्धेत जागा मिळविली आहे.
या खेळाडूंना एन.आय.एस.कोच प्रा.आशीष क्षीरसागर महात्मा बस्वेश्वर कॉलेज लातूर व डॉ.डुमणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणीसावरगांव यांचे मार्गदर्शन लाभले. या उत्तुंग यशाबदल संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव माने, सचिव पद्माकर मोगरगे, संस्थेचे कोषाध्यक्ष तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक जयेश माने, उपाध्यक्ष अँड. सुतेज माने प्राचार्य डॉ.ए.बी. धालगडे क्रीडा प्राध्यापक प्रा.बालाजी हालसे व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थ्यांनी यशस्वी खेळांडूचे अभिनंदन केले आहे.