16.3 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच क्रमांकाच्या दोन गाड्या!

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच क्रमांकाच्या दोन गाड्या!

मुंबई : मुंबईतील संवेदनशील भाग असलेल्या ताज हॉटेलमध्ये एकाच क्रमांकाची नंबर प्लेट असलेल्या दोन गाड्या सापडल्या. सुरक्षा रक्षकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तातडीने पोलिसांना ही बाब लक्षात आणून दिली. पोलिसांनी आरटीओला बोलावून बनावट नंबर प्लेटच्या गाडीचालकाला ताब्यात घेतले आहे. त्याने ही गाडी ताज हॉटेलमध्ये का आणली? त्याचा त्यामागे काय उद्देश होता? बनावट नंबर प्लेट का लावली? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांकडून शोधली जात आहेत. एमएच ०१ ईई २३८८ हा क्रमांक दोन गाड्यांवर आढळला. दोन्ही गाड्या मारुती सुझुकी आहेत.

मुंबईत २६/११चा हल्ला गेट वे ऑफ इंडियाच्या जवळ असलेल्या ताज हॉटेलमध्ये झाला होता. त्यावेळी ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांनी नागरिकांना ओलीस ठेवले होते. ताज हॉटेल संवेदनशील असल्यामुळे या ठिकाणी बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर असतो. मुंबई पोलिसांची सुरक्षा आणि ताज हॉटेलची स्वत:ची सुरक्षा या ठिकाणी आहे. त्यानंतर या ठिकाणी एकाच क्रमांक असलेल्या दोन गाड्या आल्या आहेत. या दोन्ही गाड्यांवर एमएच ०१ ईई २३८८ हा क्रमांक आहे. त्यामुळे खळबळ उडाली. सुरक्षा रक्षकांच्या लक्षात ही बाब आली. त्यानंतर पोलिसांना हा प्रकार सांगण्यात आला.

नकली नंबर प्लेट असलेली गाडी पोलिस ठाण्यात
पोलिसांनी कोणत्या गाडीची नंबर प्लेट असली आणि कोणत्या गाडीची नंबर प्लेट नकली याचा शोध घेण्यासाठी आरटीओ अधिका-यांना बोलवले. त्यानंतर बनावट नंबर प्लेट असलेली गाडी स्पष्ट झाली. बनावट नंबर प्लेट असलेली गाडी पोलिसांनी कुलाबा पोलिस ठाण्यात आणली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR