15.8 C
Latur
Friday, November 21, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईत सार्वत्रिक शौचालयांची टंचाई!

मुंबईत सार्वत्रिक शौचालयांची टंचाई!

मुंबई : प्रतिनिधी
दरवर्षी जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात येत असला तरी मुंबईसारख्या राजधानीच्या शहरात आजही शौचालयांची प्रचंड टंचाई असून उपलब्ध असलेली शौचालये एक तर प्रचंड घाण किंवा मोडकळीस आलेली आहेत. त्यातही महिलांसाठीची शौचालये अत्यल्प आहेत.

शहरातील सर्वच सार्वजनिक शौचालयांची अवस्था बिकट असून येथे जाणेही मुंबईकरांना नकोसे वाटते. नेमके शौचालय कुठे आहे? हे कोणाला विचारायचीही गरज भासणार नाही. कारण शौचालयाच्या आजूबाजूला पसरलेली दुर्गंधी आल्यावर आपसूकच शौचालयाचा पत्ता कळतो, अशी स्थिती आहे.
मुंबईतील सार्वजनिक शौचालये पूर्वी सुलभ शौचालय नावाने चालवण्यात येत होती. सुमारे १२५० पेक्षा जास्त सार्वजनिक शौचालये खाजगी संस्थांमार्फत चालवण्यात येत आहेत.

यातील काही शौचालये वापरण्यायोग्य आहेत. अन्यथा काही संस्थांकडे असलेली शौचालये ही फारशी चांगली नाहीत. तरीही नाइलाजाने लाखो मुंबईकरांसह देश- विदेशातून येणा-या पर्यटकांना घाणेरड्या व दुर्गंधीयुक्त शौचालयांचा वापर करावा लागत आहे. एका सर्व्हेनुसार पाणी आणि वीज नसलेल्या शौचालयांची संख्या ४९ टक्के इतकी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR