औसा नगर पालिका निवडणूकीत विकास व भ्रष्टाचार कळीचे मुद्दे ठरणार

औसा ग्राऊंड रिपोर्ट (संजय सगरे)

औसा नगर पालिका निवडणूक २ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे .या निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजप – शिवसेना युतीचे डाॕ .ज्योती महादेव बनसुडे व राष्ट्रवादी काॕग्रेसच्या परवीन नवाबोद्दीन शेख यांच्यात प्रमुख लढत होत आहे . ही निवडणूक प्रातिनिधीत्व स्वरुपात ओबीसी महिलासाठी असली तरी खरी लढत ही भाजपा आमदार अभिमन्यू पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांच्या नेतृत्वात आहे.

औसा नगर पालिकेत गेल्या अनेक वर्षापासून श्री अफसर शेख आहेत .यातील बहूतांश कालावधी हा त्यांच्या सत्तेचा होता .येणाऱ्या निवडणूकीत पुन्हा एकदा पालिकेची सत्ता मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत . आजवरच्या निवडणूका श्री अफसर शेख यांच्यासाठी सोप्या होत्या .परंतू यावेळच्या निवडणूकीत त्यांच्या समोर भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मोठे आव्हान उभे केलेले आहे. या निवडणूकीचा ग्राऊंड रिपोर्ट पहात असताना औशातील मतदारांची मते जाणून घेतली असता या निवडणूकीत शहराचा विकास व गुत्तेदारीतून होणारा भ्रष्टाचार , व विकास कामांचा निकृष्ट दर्जा हे कळीचे मुद्दे ठरणार अशी चिन्हे दिसत आहेत.

एकमत च्या ग्राऊंड रिपोर्टमध्ये औशातील नागरीकांनी विकास कामाचे श्रेय औशाचे आमदार अभिमान्यू पवार यांना श्रेय देत आहेत. औसा शहर वाढीव पाणीपुरवठा योजना , औसा शहरातील अनेक वस्त्यांत होत असलेले रस्ते व नालीची बांधकामे , शहराचा सर्वात महत्वाचा असणारा तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरण ,शहरात उभे राहत असलेले १०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय , नवीन वस्त्यांचा विकास , नवीन बसस्थानक , असे विविध विकास कामे आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून व पाठपुरावा व पुढाकारातून झाली असल्याचा दावा उपस्थित भाजपा समर्थकांनी केला व नगरपालिकेतील अफसर शेख यांच्या कार्यकाळात झालेली विकास कामे ही निकृष्ट दर्जाची झाली असून या कामामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. बहूतांश मंडळीनी येणा-या काळात विकासाला साथ देणार असल्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औसा नगरपालिकेला विशेष निधी दिल्यामुळेच औशातील विविध योजना मार्गी लागल्या आहेत. कोरोना काळात अनेक योजनाना स्थगिती मिळाली होती परंतू औशाचे तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष अफसर शेख यांच्या पाठपुराव्यामुळेच औसा वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर झाली व पूर्ण झाली आहे .याचे श्रेय आमदारांनी घेवू नये .याउलट औसा शहराचे महत्व कमी करण्यासाठी औसा तहसीलचे विभाजन करुन किल्लारी येथील अपर तहसील कार्यालयास जोडत आहेत . औसा बसस्थानकाचे स्थलांतर झाल्याने औशाची जुनी बाजारपेठ ओस पडत आहे. एम आयडीसीचे ही असेच औसा एमआयडीसी चा विस्तार करण्याऐवजी बेलकुंड येथे वाढीव एमआयडिसी आणत आहेत. निर्माणाधिन असलेले ग्रामीण रुग्णालय औसा शहराबाहेर जात होते यास श्री अफसर शेख यांनीच हरकत घेतल्याने हे सुसज्ज रुग्णालय होत आहे असा दावा अफसर शेख समर्थकांनी केला आहे.

एकंदरीत औसा नगर पलिका निवडणूक ही विकास आणि निकृष्ट कामे या मुद्द्यावर गाजणार आहे असे दिसत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59
Video thumbnail
Parbhani|थारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांचा खुनाचा आरोप
03:58
Video thumbnail
शिवीगाळीनंतरही मोदींचा संयम; 'भरकटलेल्यांना योग्य मार्ग दाखवणं आपलं कर्तव्य'
03:06
Video thumbnail
Latur|छत्रपती शिवाजी महाराज चौक–दयानंद गेट रस्ता जलमय; वाहनचालकांना करावी लागतेय सर्कस
03:16
Video thumbnail
Latur Police Student Dialogue 2.0 | २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांशी पोलीस साधणार थेट संवाद
06:41
Video thumbnail
Latur News | छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भुयारी मार्ग धोकादायक, नागरिकांचा संताप
03:51
Video thumbnail
Latur|सीताराम नगरात रस्ते जलमय; खड्ड्यांमुळे अपघात वाढले,मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
02:45
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! वर्षभरापूर्वी बांधलेला पूल पुरात तुटला,उमरा–मेट मार्ग बंद; पुरामुळे वाहतूक ठप्प
01:10
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील तिरु नदीला पूर; पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका
00:24
Video thumbnail
जळकोटला मुसळधार पावसाने झोडपले; पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
02:00
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! थोड्याशा पावसात रस्ता खचला, कार थेट खड्ड्यात
02:08
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पावसाचा जोर कायम; नदीकाठच्या गावांना अलर्ट!
01:10
Video thumbnail
Latur|लातूरचा 'आंबेडकर चौक' की तळं? थोड्याशा पावसातच रस्ता जलमय!
02:54

Latest news