22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeक्रीडामॅक्सवेलचे वादळी शतक, ऑस्ट्रेलिया विजयी

मॅक्सवेलचे वादळी शतक, ऑस्ट्रेलिया विजयी

गुवाहाटी : ग्लेन मॅक्सवेलच्या वादळी शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच विकेटने पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-१ ने कमबॅक केले. भारताने दिलेल्या २२३ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर ५ विकेट राखून पूर्ण केले. ग्लेन मॅक्सवेलने ४८ चेंडूत १०४ धावांचा पाऊस पाडला. मॅक्सवेलच्या वादळी शतकामुळे ऋतुुराज गायकवाडचे शतक व्यर्थ ठरले.

ग्लेन मॅक्सवेलच्या वादळामध्ये भारतीय गोलंदाजांचा पालापाचोळा झाला. एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. रवि बिश्नोई याचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला धावगतीला आवर घालता आली नाही. मॅक्सवेलच्या शतकामुळेच ऑस्ट्रेलियाने अशक्यप्राय विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाला अखेरच्या ४८ चेंडूत १०२ धावांची गरज होती. मॅक्सवेलने भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. ग्लेन मॅक्सवेल याने ४८ चेंडूत नाबाद १०४ धावांची खेळी केली. मॅक्सवेलने अखेरच्या षटकात २३ धावा वसूल करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. त्याने आठ गगनचुंबी षटकार आणि आठ खणखणीत चौकार लगावले.

मॅक्सवेल आणि मॅथ्यू वेड यांनी सहाव्या विकेटसाठी ४० चेंडूत ९१ धावांची अभेद्य भागिदारी केली. यामध्ये मॅक्सवेलने ५७ धावा चोपल्या तर मॅथ्यू वेड याने २८ धावांचे योगदान दिले. मॅक्सवेलने स्टॉयनिसोबत ६० धावांची भागिादरी केली. मॅक्सवेलच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने मालिकेतील आव्हान जिवंत ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड याने १८ चेंडूत ३५ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने ८ चौकार ठोकले. त्याशिवाय एरॉन हार्डे याने १२ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने १६ धावा केल्या. जोस इंग्लिश याने ६ चेंडूत दहा धावा केल्या. मार्कस स्टॉयनिसने २१ चेंडूत १७ धावा केल्या. टीम डेविडला खातेही उघडता आले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR