34 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeक्रीडाचौथ्या सामन्यात विजय, यंग ब्रिगेडने जिंकली मालिका

चौथ्या सामन्यात विजय, यंग ब्रिगेडने जिंकली मालिका

रायपूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने २० धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेत मालिका जिंकली. प्रथम फलंदाजी करत भारताने ९ बाद १७४ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल ऑस्ट्रेलियाला केवळ १५४ धावा करता आल्या. दोन्ही संघातील पाचवी आणि अखेरची टी-२० मॅच ३ डिसेंबर रोजी बंगळुरू येथे होणार आहे. या विजयासह भारताने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील एक मोठा विक्रम नावावर केला. आता भारत टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक सामने जिंकणारा संघ ठरला. भारताने पाकिस्तानच्या टी-२० मधील १३५ विजयांचा विक्रम मागे टाकला. ऑस्ट्रेलियावरील चौथ्या सामन्यातील विजय हा भारताचा आंतरराष्ट्रीय टी-२० मधील १३६ वा विजय ठरला.

भारताने दिलेल्या १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली होती. ४० धावांवर त्यांनी पहिली विकेट गमावली. रवी बिश्नोईने जोश फिलिपला माघारी पाठवले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने नियमित अंतराने विकेट गमावल्या. कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक नाबाद ३६ धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या तर दीपक चहरने २, बिश्नोई आणि आवेश खान यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. भारताच्या भेदक मा-यापुढे ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. चांगल्या सुरुवातीनंतर एक-एक विकेट पडत गेल्या. त्यामुळे भारताचे माफक आव्हान पार करता आले नाही. त्यामुळे निर्धारित षटकात ऑस्ट्रेलियाला १५४ धावाच करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा २० धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने नुकत्याच झालेल्या विश्वकपमध्ये भारताचा पराभव केला होता. या पराभवाचा यंग इंडियाने लगेचच वचपा काढून मालिका जिंकली. आता पाच सामन्यातील पाचवा सामना बंगळुरूला होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR