बारामती : संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी काठेवाडीत दाखल झाला होता. त्यानंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ््यातील मेंढ्याचे पहिले गोल रिंगण उत्साहात पार पडले. येथील मेंढ्यांचा वैशिष्ट्यपूर्ण रिंगण सोहळा पाहण्यासाठी आबाल-वृद्धांसह वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होता. तत्पूर्वी येथील ग्रामस्थांनी धोतराच्या पायघड्या घालत पारंपारिक सनई चौघडाच्या, वाद्यांच्या निनादात तुकोबांच्या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले.
रिंगणाच्या पाच फे-या पूर्ण होईपर्यंत अखंड तुकोबा आणि माऊलीचा नामघोष सुरू होता. रिंगण सोहळ््यानंतर पालखीने इंदापूर तालुक्यातील सणसर मुक्कामी प्रस्थान केले. दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ््याचे चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण पार पडले. हा रिंगण सोहळा ऐनवेळी नवीन जागी घेण्यात आला. यावेळी मानाचा अश्व धावू लागताच हजारो वारक-यांनी जयघोष केला. डोळ््याचे पारणे फेडणारा हा क्षण भाविकांनी डोळ््यात साठवला.