ब्युनस आयर्स : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामुळे तो पुन्हा कधी अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघात दिसणार नाही. फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. या सामन्यात अर्जेंटिनाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सलग दोनदा जेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंगले होते.
फुटबॉलमधून निवृत्ती घेताना मेस्सी म्हणाला की, हा निर्णय घेताना मला खूप त्रास झाला आणि अजूनही होत आहे, पण आता थांबण्याची वेळ आली आहे. त्याने अर्जेंटिनासाठी एकूण २०७ सामने खेळले. अर्जेंटिनासाठी सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू म्हणून त्याच्या नावावर विक्रम नोंदवला गेला. या कालावधीत त्याने अर्जेंटिनासाठी एकूण १२५ गोल मारले आहेत. अर्जेंटिनाचा ऑल-टाईम लीडिंग गोल स्कोअरर म्हणूनही त्याच्या नावावर विक्रम आहे. त्या्च्या फुटबॉल कारकिर्दीत एकदा फिफा वर्ल्ड कप स्पर्धेवर नाव कोरले आहे. तसेच प्रतिष्ठेचा कोपा अमेरिका कप दोन वेळा जिंकला. बॅलन डी’ओर आठ वेळा मिळवला. इतक्या वेळा हा पुरस्कार मिळवणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे.
















