26.4 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रमोदीच अतृप्त आत्मा, म्हणूनच पक्ष फोडतात

मोदीच अतृप्त आत्मा, म्हणूनच पक्ष फोडतात

रोहित पवारांनी पोस्ट केला व्हीडीओ

पुणे : पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता, त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झाला असून ४५ वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्याने या खेळाची सुरुवात केली, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनीही आक्रमकपणे त्यांना प्रत्युत्तर दिले. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी यासंदर्भातील एक व्हीडीओ शेअर केला असून या व्हीडीओतून पंतप्रधान मोदी यांच्यावर उपहासात्मक टीका करण्यात आली.

कहाणी अतृप्त आत्म्याची! असे कॅप्शन देत रोहित पवारांनी हा व्हीडीओ शेअर केला आहे. अतृप्त आत्मे पांढरा हाफ शर्ट घालून उन्हातान्हात फिरत नाहीत, तर दिवसाला जे पाच वेळा कपडे बदलतात ते अतृप्त आत्मे असतात. संकट अस्मानी असो किंवा सुलतानी अतृप्त आत्मे मदतीला धावत नाहीत, तर जवान शहीद झाले, तरी जे जंगलात शूटिंग करतात, ते अतृप्त आत्मे असतात. रडार दिसले की ढगामागे आणि रडायला आलं की मंगळसूत्रामागे लपतात, ते अतृप्त आत्मे असतात.

अतृप्त आत्मे महिलांच्या कल्याणासाठी धोरणात्मक निर्णय घेत नाहीत, तर महिलांची धिंडही कोरड्या डोळ्याने बघतात. अतृप्त आत्मे भर पावसात चिंब भिजत नाहीत, तर ज्यांना कॅमेरा महत्त्वाचा, ते अतृप्त आत्मे असतात. हजारो कोटींच्या विमानातून फिरले तरी स्वत:ला फकीर म्हणतात, ते अतृप्त आत्मे असतात’’, अशी टीका या व्हीडीओतून करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR