लातूर : प्रतिनिधी
ईद-ए-मिलादुन्नबी आणि ज्ञानप्रकाश रौप्य महोत्सवानिमित्त विविध विषयावरती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणा-या व्यक्तीचा ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. कळंब येथे झालेल्या या कार्यक्रमात लातूर येथील मोहसीन खान यांनाही ‘स्व. सलीम भाई मिर्झा समाजरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अशोक मोहेकर होते. प्रमुख पाहूणे म्हणून प्रताप पाटील, अजित पिंगळे, राजेंद्र आबा मुंडे, मुख्तार मिर्झा उपस्थित होते तर प्रमुख वक्ता म्हणून अविनाश भारती हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ‘आगाज’ फाउंडेशनचे अध्यक्ष अकिब नय्युम पटेल, उपाध्यक्षकार्तिक शंकर इंगळे, सचिव मुस्तान मुख्तार मिर्झा, सहसचिव इमरान जफरखान पठाण, कोषाध्यक्ष अक्षय सिद्धार्थ गायकवाड, कार्याध्यक्ष शफिक महमूद शेख, ज्ञानेश्वर नरटे, खादिम सय्यद, विश्वजित बाळासाहेब दुगाने, अमर बाबासाहेब पायाळ, रामेश्वर बालाजी दारशेवाढ यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक मुस्तान मिर्झा यांनी केले मांडले तर अकीब पटेल यांनी आभार मानले.
















