पांढरवाडी तलावातील पाण्याचा बेसुमार उपसा

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील पांढरवाडी तलावात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असताना शेतीसाठी बेसुमार पाणीउपसा सुरू असल्याने येरोळसह चार गावांवर आगामी काळात भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या या तलावातील उपलब्ध पाणीसाठा जपण्याऐवजी शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसले जात असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
   पांढरवाडी तलावातून तालुक्यातील येरोळसह पांढरवाडी, हनमंतवाडी आणि जांभळवाडी या चार गावांना पाणीपुरवठा केला जातो. येरोळ हे तालुक्यातील मोठे गाव असून, मोठ्या लोकसंख्येचा पिण्याच्या पाण्याचा भार याच तलावावर आहे. त्यामुळे तलावातील पाणीसाठा कमी होत असताना त्याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. दरम्यान काही शेतक-यांकडून विद्युत मोटारीद्वारे शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणीउपसा सुरू असल्याने तलावातील पाणीसाठ्यावर अतिरिक्त ताण पडत आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जलस्रोतांमध्ये अपेक्षित पाणीसाठा निर्माण झाला नसताना तलावातील उपलब्ध पाणीही शेतीसाठी उपसले जात असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
  भविष्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन येरोळ ग्रामपंचायतीने पांढरवाडी तलावातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याची मागणी शिरूर अनंतपाळ तहसील प्रशासनाकडे केली आहे मात्र, या मागणीवर अद्याप प्रभावी कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. तलावातील पाणीसाठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवून शेतीसाठी होणारा बेसुमार पाणीउपसा तातडीने थांबवावा, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलली नाहीत तर उन्हाळ्यापूर्वीच येरोळसह चार गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची  वेळ येण्याची भीती व्यक्त होत  आहे.  पाणीटंचाई निर्माण होण्याची वाट पाहण्यापेक्षा प्रशासनाने आताच तलावातील पाणीउपशावर नियंत्रण आणून उपलब्ध पाणीसाठ्याचे संरक्षण करावे, अशी मागणी सरपंच सतीश शिंदाळकर व ग्रामस्थांकडून होत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नारळी पौर्णिमेला माहूर गडावर भाविकांची अलोट गर्दी; हजारो जण पायी दत्त शिखराकडे
00:39
Video thumbnail
Latur|बुलेटवर फटाका वाजवताय? सावधान! लातूर पोलिसांची थेट कारवाई
01:47
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो लक्ष द्या! १ सप्टेंबरपासून महामार्गावर हेल्मेट सक्ती;हेल्मेट नाही तर दंड
02:38
Video thumbnail
Nanded Murder|नांदेडमध्ये रक्तरंजित थरार! जुन्या वादातून तरुणाचा खंजरने खून
00:50
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामसभेत मोठा गोंधळ! प्रश्नांवरून सत्ताधारी-विरोधक भिडले
07:02
Video thumbnail
PARBHANI|गौरवाच्या क्षणांची साक्ष... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
31:41
Video thumbnail
NANDED|एकमतच्या सन्मानाची... सन्मानार्थींच्या मनातील भावना
45:46
Video thumbnail
DHARASHIV|गौरवाच्या क्षणांची साक्ष... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
42:06
Video thumbnail
Solapur|एकमत वर्धापन गौरव २०२६... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
28:21
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - परभणी
02:04:02
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - नांदेड
02:12:44
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - धाराशिव
02:10:21
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत- सोलापूर
02:13:30
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52

Latest news