27.6 C
Latur
Friday, June 13, 2025
Homeअंतरराष्ट्रीययुक्रेन हादरले; ४०० ड्रोन आणि ४० क्षेपणास्त्रांनी रशियाचा हल्ला

युक्रेन हादरले; ४०० ड्रोन आणि ४० क्षेपणास्त्रांनी रशियाचा हल्ला

किव्ह : वृत्तसंस्था
रशियाने युक्रेनच्या सर्व प्रमुख परिसरात ४०० हून अधिक ड्रोन आणि ४० हून जास्त बॅलेस्टिक मिसाईलने प्रतिहल्ला केला. रशियाने केलेल्या या हल्ल्याने युक्रेन हादरले आहे.

रशियाने ज्या भागावर हल्ला केला त्यात वोलिन, लविव, टेरनोपिल, किव, सुमी, पोल्टावा, खमेलनित्सकी, चर्कासी, चेर्निहिव यांचा समावेश आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ट्विट करून रशियाच्या हल्ल्याविरोधात युक्रेनी हवाई दलाने अनेक मिसाईल, ड्रोन नष्ट केले आहेत. परंतु या हल्ल्यात ३ आपत्कालीन सेवा कर्मचा-यांचे मृत्यू आणि ४९ हून अधिक लोक जखमी आहेत. मलबा हटवण्याचं काम सुरू असून बचाव पथकांनी शोध मोहिम हाती घेतली आहे असे सांगितले.

तसेच रशिया त्यांच्या धोरणात बदल करत नाही. तो सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करत आहे. आता हे युद्ध केवळ युक्रेनचे राहिले नाही तर मानवतेविरोधात युद्ध आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर रशियाला जबाबदार धरले पाहिजे. अमेरिका, युरोप आणि संपूर्ण जगाला आता निर्णायक दबाव बनवावा लागेल. जर जागतिक नेते गप्प बसले तर ते देखील यात सामील असतील. आता निर्णायक पाऊले उचलण्याची वेळ आली आहे. केवळ समर्थनाने युद्ध थांबणार नाही, असंही वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटलं.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR