25 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeसोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांचा सत्कार

 युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांचा सत्कार

सोलापूर- काँग्रेस भवन सोलापूर येथे देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ,खासदार प्रणिती शिंदे,माजी आमदार प्रकाश यलगुलवार सर, शहर काँग्रेस कमिटी चेतन नरोटे व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांची भारत सरकारच्या मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आपल्या मनोगतात म्हणाले गणेश डोंगरे हा पंधरा वर्षापासून काँग्रेस पक्षासाठी सत्ता असू दे नसू दे पक्ष वाढीसाठी नेहमी प्रयन्त करत असतो. युवकांना नेहमी काँग्रेस पक्षाकडे आकर्षित ठेवण्याचे काम करत असतो. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त युवकांना संधी देणार असल्याचे म्हटले.

खासदार प्रणिती शिंदे आपल्या मनोगतात म्हणाल्या की रेल्वे प्रवाशांचे प्रश्न गणेश डोंगरे चांगल्या पद्धतीने सोडवतील व आपण मोहोळ, हडपसर येथे रेल्वे थांबा बद्दल प्रयन्त रेल्वे प्रशासनाकडे सातत्यांने करत रहा.

सत्काराला उत्तर देताना गणेश डोंगरे म्हणाले खासदार प्रणिती शिंदे यांच्या मुळे माझ्या सारख्या कार्यकर्तेला सत्ता नसताना इतकी मोठी रेल्वे कमिटी मध्ये संधी मिळते हे माझे भाग्य आहे.महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश विभागलेल्या नागपूर, मुंबई, पुणे, सोलापूर,भुसावळ विभागमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. येणाऱ्या काळामध्ये प्रामाणिक पणे रेल्वे प्रवाशाच्या अडी अडचणी सोडवण्याचा प्रयन्त करेन. यावेळी सत्कार व स्नेहभोजन कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे माजी महापौर, माजी नगरसेवक, प्रदेश पदाधीकारी, फ्रंटल व सेल अध्यक्ष व पदाधीकारी मित्र परिवार मोठया संखेंने उपस्थितीत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR