27.2 C
Latur
Monday, March 9, 2026
Homeमहाराष्ट्रराजकीय पोळी भाजण्यासाठी व्हल्गर विधानं करू नयेत

राजकीय पोळी भाजण्यासाठी व्हल्गर विधानं करू नयेत

 मंत्री गिरीश महाजन यांचा रोहित पवारांना टोला

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर अवघा महाराष्ट्र हळहळला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अशा पद्धतीने शेवट होईल याची कल्पना कुणालाच नव्हती. दरम्यान अजित पवारांच्या अपघातानंतर हा अपघात आहे की घातपात याच्या चर्चा सुरू झाल्या. रोहित पवारांनी तीन ते चारवेळा पत्रकार परिषद घेतली आणि अजित पवारांचा मृत्यू घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. यानंतर आता राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी गलिच्छ राजकारण कोण करतं आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांनी ऊॠउअ ने दिलेला अहवाल, श्रफ कंपनीला मिळत असलेले अभय, या कंपनीच्या मालकाने सीआयडी चौकशीला सामोरे जात असताना मिळालेली व्हीआयपी ट्रीटमेंट या सगळ्यावर भाष्य केले होते. तसेच अजित पवारांना न्याय मिळाल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही असेही म्हटले होते. रोहित पवार यांनी आत्तापर्यंत तीन पत्रकार परिषदा घेऊन त्यामध्ये काही मुद्यांचं सादरीकरण केलं. आता गिरीश महाजन यांनी त्यांना उत्तर दिले आहे. राजकीय पोळी शेकण्यासाठी कुणी राजकारण करू नये असे गिरीश महाजन म्हणाले आहेत.

गलिच्छ राजकारण कुणाकडून सुरू आहे सगळ्यांना दिसतं आहे. पण मी पुन्हा सांगेन की अजित पवारांच्या अपघाती निधनाचे राजकारण कुणीही करू नये. उगाच काहीही बोललं जात आहे, कुणी म्हणतंय बॉम्ब ठेवला, कुणी म्हणतंय सुसाईड बॉम्बर होता वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. कुणीही अकलेचे तारे तोडत आहेत. या प्रकरणाची चौकशी व्हावी ही सगळ्यांची भावना आहे. मुख्यमंत्र्यांनाही हेच वाटतं आहे. त्यामुळे राजकीय पोळी शेकण्यासाठी कुणी व्हल्गर विधान करू नये, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे सोमवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. जय पवार या पत्रकार परिषदेत काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने तसेच मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. केंद्र शासनाकडूनही गंभीर दखल या अपघाताची घेण्यात आली आहे. कुणाला काही वाटत असेल तर त्यांनी दिल्लीला जावं. अपील करायचं असेल तर ते करावं. कुणाला अर्ज करायचा असेल तर करू शकतात. काही मागणी करायची असेल तर करू शकतात. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये १०० टक्के पारदर्शकता आहे. संभ्रम असण्याची काडीमात्र शक्यता नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR