27.2 C
Latur
Tuesday, May 20, 2025
Homeक्रीडाराजस्थानची रॉयल विजयी सांगता

राजस्थानची रॉयल विजयी सांगता

६ गडी राखून विजय, सीएसकेला सूर सापडलाच नाही
दिल्ली : वृत्तसंस्था
वैभव सूर्यवंशीच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ६ गडी राखून पराभव केला. या राजस्थान संघाने आयपीएल २०२५ मधील आपला प्रवास विजयाने संपवला.

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून सीएसकेला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. प्रथम फलंदाजी करताना सीएसके संघाने निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, राजस्थानने १७ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.राजस्थानच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी पुन्हा एकदा संघाला स्थिर सुरुवात दिली.

सुरुवातीला यशस्वीने स्फोटक फलंदाजी करत राजस्थानची धुरा सांभाळली. जलद खेळी करण्याचा प्रयत्न करताना यशस्वी अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर बाद झाला. यशस्वीने १९ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांसह ३६ धावांची खेळी केली. दुसरीकडे वैभवची सुरुवात संथ होती. पण क्रीजवर सेट झाल्यानंतर त्यानेही आपला गियर बदलला. वैभवला कर्णधार संजू सॅमसनची उत्तम साथ मिळाली.

यादरम्यान वैभवने २७ चेंडूत षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर कर्णधार संजू सॅमसन ३१ चेंडूत ४१ धावा करून बाद झाला. संजू बाद होताच वैभव जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही आणि ३३ चेंडूत ५७ धावा करून बाद झाला. वैभवने त्याच्या डावात ४ चौकार आणि ४ षटकारही मारले.

वैभव बाद झाल्यानंतर संघाला सहज विजयाकडे नेण्याची जबाबदारी रियान पराग आणि ध्रुव जुरेलवर होती. परंतु नूर अहमदने रियान परागला त्याच्या फिरकीत अडकवले आणि त्याला बाद केले. रियाननंतर सीएसके सामन्यात परतल्यासारखे दिसत होते. पण त्यांचे गोलंदाज दिशाहीन होते आणि संधीचा पुरेपूर फायदा घेऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत शिमरॉन हेटमायरने ध्रुव जुरेलसह कोणतीही चूक केली नाही आणि १७ चेंडू शिल्लक असताना संघाला विजय मिळवून दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR