मुंबई : प्रतिनिधी
अभिनेते रितेश विलासराव देशमुख स्टारर आणि दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केल्यानंतर सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
सिनेमात रितेश यांनी मुख्य भूमिका साकारली आणि चाहत्यांना अभिनेत्याची भूमिका आवडली देखील. ‘राजा शिवाजी’ सिनेमात अभिनेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला. चाहत्यांनी देखील सिनेमाला डोक्यावर घेतले. आता ‘राजा शिवाजी’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याचा अर्थ असा की, ज्यांनी हा सिनेमा चित्रपटगृहात पाहिला नाही, ते आता घरबसल्या याचा आनंद घेऊ शकतील. ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा २६ जून, शुक्रवारी ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, या प्लॅटफॉर्मकडून अद्याप कोणत्याच प्रकारची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सिनेमाच्या बजेटबद्दल सांगायचे झाले तर, रिपोर्टनुसार, सिनेमाने १०० कोटींमध्ये तयार झाला आहे तर सिनेमाची कमाई १३० कोटी आहेङ्घ मराठी सिनेविश्वात १०० कोटींचा गल्ला पार करणारा ‘राजा शिवजी’ सिनेमा पहिला सिनेमा ठरला आहे. ‘राजा शिवाजी’ सिनेमानंतर मराठी सिनेमाचे चांगले दिवस आले.. असं म्हणायला हरकत नाही.
‘राजा शिवाजी’ सिनेमातील स्टार कास्ट
सिनेमाचे दिग्दर्शन रितेश विलासराव देशमुख याने केले असून, सिनेमात मुख्य भूमिका देखील त्यानेच साकारली आहे. ‘राजा शिवाजी’ सिनेमात रितेश देशमुख यांच्यासह जय दत्त, जिनिलिया रितेश देशमुख, महेश मांजरेकर, अभिषेक बच्चन, विद्या बालन, अमोल गुप्ते, भाग्यश्री यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. सिनेमात अभिनेता सलमान खान याने देखील पाहुण्या कलाकारची भूमिका साकारली. सिनेमा १ मे २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेला.
















