मुंबई : प्रतिनिधी
राज्यात आणि देशात सुरू असणा-या घटनाबा राजकीय गोष्टींना सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी राज्यातील काळजीवाहू सरकारवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला आहे. मात्र, अद्यापही बहुमत मिळालेल्या महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावाही करण्यात आलेला नाही आणि राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
त्यामुळे यावरून आता विरोधकांनी भाजपाला घेरण्यास सुरुवात केली आहे. परंतु, राज्यात आणि देशात सुरू असणा-या घटनाबा राजकीय गोष्टींना सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी राज्यातील काळजीवाहू सरकारवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले असून सुप्रीम कोर्ट, केंद्रीय निवडणूक आयोगावरही हल्लाबोल केला आहे.
काळजीवाहू सरकार संविधानाच्या विरोधात
माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी घटनापीठावर बसून महाराष्ट्र असेल किंवा संभलचा विषय असेल याबाबतीत अत्यंत घटनाबा काम करून देशामध्ये आग लावण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रामध्ये घटनाबा सरकारला सुप्रीम कोर्टाने संरक्षण दिले, त्यामध्ये डी. वाय. चंद्रचूड होते. आता त्याच पद्धतीने हे घटनाबा काळजीवाहू सरकार आहे. हे काळजीवाहू सरकार हे सुद्धा संविधानाच्या विरोधात आहे.