19.4 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeआरोग्यराज्यात ६ सुपर स्पेशालिटी मेडिकल कॉलेजला मंजुरी

राज्यात ६ सुपर स्पेशालिटी मेडिकल कॉलेजला मंजुरी

एमबीबीएसच्या ७०० अतिरिक्त जागा : लातूर, संभाजीनगरचा समावेश

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील आरोग्य सुविधांचा विस्तार आणि बळकटीकरण करण्यासाठी केंद्राने सहा सुपरस्पेशालिटी सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि एमबीबीएसच्या ७०० अतिरिक्त जागा मंजूर केल्या आहेत.

महाराष्ट्रात गोंदिया आणि नंदुरबार येथे केंद्र-राज्य खर्च सामायिकीकरण तत्त्वावर दोन वैद्यकीय महाविद्यालये मंजूर करण्यात आली आहेत. ती रुग्णालयांशी संलग्न केली जातील. ११ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ६९२ पदव्युत्तर जागा मंजूर करण्यात आल्या आहेत. यासाठी ३४५.७९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय, महाराष्ट्रातील १४ महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या ७०० अतिरिक्त जागा मंजूर करण्यात आल्या आहेत. यासाठी ८३९.८६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

सहा वैद्यकीय महाविद्यालय अशी…
या सहा वैद्यकीय महाविद्यालयांत ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जे. जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, मुंबई; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला आणि वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ यांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR