राज्यात ८ महिन्यांत ११८३ शेतकरी आत्महत्या

मुंबई : प्रतिनिधी
निसर्गाचा लहरीपणा यातून होणारी उत्पन्नातील घट; यामुळे शेतकरी हतबल होऊन जात असतो. यात कर्ज फेड होऊ शकत नसल्याने संकटात सापडलेला शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असतो. यामुळे राज्यात शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यात मागील आठ महिन्यांत तब्बल एक हजार १८३ शेतक-यांनी जीवनयात्रा संपविल्याचे समोर आले आहे.

राज्यात १४ जिल्हे शेतकरी आत्महत्या प्रवण आहेत. यामध्ये विदर्भातील सहा आणि मराठवाड्यातील आठ जिल्हे आहेत. या १४ जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांची नोंद घेतल्या जातात. त्यानुसार मागील आठ महिन्यांमध्ये अतिवृष्टीने शेतक-याचे झालेले नुकसान, कर्जबाजारीपणा, योग्य हमीभाव आणि नैसर्गिक आपत्तीच्या विविध कारणामुळे शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहे. यात सर्वाधिक प्रमाण हे पश्चिम विदर्भात आहे.

शेतीसाठी कर्ज काढून शेतकरी पेरणी करून पिकांना खत पाणी देत असतो. मात्र अतिवृष्टी तसेच अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. यामुळे शेतक-यांना अपेक्षित असलेले उत्पन्न शेतातून मिळत नाही. यात बळीराजा आर्थिक संकटात सापडून टोकाचा निर्णय घेत असतो. यामुळे गेल्या काही काळात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण देखील वाढले आहे. यात मागील आठ महिन्यांचा विचार केल्यास राज्यातील शेतकरी आत्महत्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात महिनाभरात ४४ आत्महत्या
जानेवारी ते ऑगस्ट या ८ महिन्यांमध्ये तब्बल ११८३ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक ४४ शेतकरी आत्महत्या ऑगस्ट महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहे. तर ११८३ शेतकरी आत्महत्यामध्ये ६०७ शेतकरी आत्महत्या पात्र ठरविण्यात आल्या. तर ३०६ शेतकरी आत्महत्या अपात्र करण्यात आल्या. आठ महिन्यात छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये ५२० शेतकरी आत्महत्याची नोंद आहे आणि पश्चिम विदर्भात ७०७ शेतकरी आत्महत्याची नोंद आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|'ही कर्जमाफी नाही, कर्जवसुली योजना!' – रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
10:08
Video thumbnail
Karmala|खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
00:53
Video thumbnail
BREAKING : लातूर जिल्ह्यासाठी ४८४ कोटींचा विकास आराखडा मंजूर;DPDC बैठकीत महत्त्वाचे निर्णय
06:19
Video thumbnail
Latur|दोन दिवसांच्या पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत; पण कृषी विभागाचा मोठा इशारा!
02:54
Video thumbnail
BREAKING| ड्रेनेजच्या नावाखाली खोदलेले रस्ते ठरले जीवघेणे!; नारायण नगरात अपघातांचा धोका वाढला
05:30
Video thumbnail
कायदा-सुव्यवस्थेलाच खुलेआम आव्हान...किल्लारीत पोलिसांनाच जिवे मारण्याची धमकी‌ #breakingnews #marathi
00:39
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
09:27
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
00:00
Video thumbnail
BREAKING : जळकोट तालुक्यात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत लाखोंचा घोटाळा उघड
01:03
Video thumbnail
मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला साडी-चोळी आणि बांगड्या; तुळजापुरात संतप्त महिलांकडून अनोखा निषेध
02:30
Video thumbnail
पालखी मार्ग, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा वेळेत पूर्ण करा; जि प सभेत विविध विभागांना समन्वयाचे आदेश
07:01
Video thumbnail
Rohit Pawar|लातुरातून रोहित पवारांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
07:29
Video thumbnail
Parbhani|परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक आग; BLO बैठकीत उडाली धावपळ
02:56
Video thumbnail
BREAKING : लातूर शहरासह जिल्हाभरात पावसाची दमदार सुरुवात
02:07
Video thumbnail
Latur|मुरुडला नगरपंचायत दर्जा द्या; माजी आमदार धीरज देशमुख यांची सरकारकडे मागणी
05:03

Latest news