आयर्लंडचा भारतावर ऐतिहासिक विजय, पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा ३४ धावांनी पराभव

बेलफास्ट: टी-२० वर्ल्ड कपचे विजेतेपद सलग दुसऱ्यांदा पटकावल्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय क्रिकेट संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. आयर्लंडने टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा ३४ धावांनी पराभव केला. सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात १८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव १८.५ षटकांत अवघ्या १४८ धावांवर आटोपला. या पराभवासोबतच भारतीय खेळाडूंच्या नावावर काही लाजिरवाण्या विक्रमांची नोंद झाली आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासात आयर्लंडने भारताला हरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी खेळल्या गेलेल्या सर्व ११ सामन्यांत भारताने विजय मिळवला होता. २००७ मध्ये या दोन्ही संघांमध्ये पहिला सामना झाला होता. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारताला पराभूत करणारा आयर्लंड हा जगातील ११ वा संघ ठरला आहे.

सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. यापूर्वी २०२४ मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघ जेव्हा झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता, तेव्हाही पहिल्याच सामन्यात असाच पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाची आयरिश फलंदाजांनी जोरदार धुलाई केली. प्रसिद्ध कृष्णाने या सामन्यात ४ षटकांत तब्बल ५७ धावा दिल्या. यापूर्वीच्या टी-२० सामन्यात त्याने ६८ धावा दिल्या होत्या. यामुळे सलग दोन आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत मिळून सर्वाधिक १२५ धावा देणारा तो गोलंदाज ठरला आहे. सामन्यातील १७ व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाला आयर्लंडच्या गॅरेथ डेलनीने सलग ३ षटकार ठोकले आणि या एकाच षटकात आयरिश फलंदाजांनी २७ धावा चोपल्या. आयर्लंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात महागडे षटक टाकणारा तो भारतीय गोलंदाज बनला आहे.

भारतीय टी-२० संघाचा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचा हा पहिलाच सामना होता. दुर्दैवाने, कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागणारा तो चौथा भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली, ऋषभ पंत आणि शुबमन गिल यांनाही आपल्या पहिल्याच टी-२० सामन्यात कर्णधार म्हणून पराभवाचा सामना करावा लागला होता.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06

Latest news