19.4 C
Latur
Monday, October 13, 2025
Homeमहाराष्ट्ररामदास कदम अडचणीत

रामदास कदम अडचणीत

ठाकरे गटाचा नेता दाखल करणार अब्रुनुकसानीचा दावा

मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना(ठाकरे गट)चे स्थानिक नेते संजय कदम यांनी रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मागील १५-२० वर्षांपासून आम्ही विभागाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत. २०१६ ते २०१९ दरम्यान झोपडीधारकांना भाडे दिले होते. त्यानंतर डीएचएफएलने या प्रकल्पाला लोन दिले, मात्र कंपनीच्या अडचणींमुळे प्रक्रिया अडकली. हायकोर्टाने आम्हाला थकित भाडे देण्याचे आदेश दिले असून लवकरच ते मिळणार आहे, असे कदम म्हणाले.

रामदास कदम यांच्या अनिल परब आणि संजय कदम यांनी झोपडीधारकांना फसवले या आरोपांना संजय कदम यांनी खोडून काढले. आम्ही दोन वर्षांचे भाडे दिले आहे, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. ८ हजार झोपडीधारकांचा आकडा खोटा आहे, काही लोकांनी भाडे घेऊन स्वेच्छेने जागा सोडली आहे. लॉकडाऊन काळात आम्ही २५० जणांची राहण्याची सोय केली होती, असे त्यांनी सांगितले.

परब आपला केबलचा व्­यवसाय असल्­याचे सांगतात. पण त्यांनी किती बोगस कंपन्या काढल्या सांगा. वडील, भाऊ, पत्नी, मुलगी यांच्या नावे कंपन्या काढल्या आहेत. आम्­हाला बदनाम करण्­यासाठी अनिल परब हे ठाकरेंच्­या सांगण्­यावरून बोलत आहेत. त्­यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. मागील काही वर्षांपासून माझा मुलगा योगेश कदम यांना टार्गेट केले जात आहे. खेडमध्ये अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला ताकद दिली. योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांना भेटून परब यांची तक्रारही केली होती. योगेश कदम मंत्री झाल्याने आता परब यांना पोटशूळ उठले आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR