31.8 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeराष्ट्रीयराम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेतील मुख्य पुजारी पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेतील मुख्य पुजारी पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन

अयोध्या : वृत्तसंस्था
अयोध्या येथील मंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा करणारे, या सोहळ्यात सहभागी होऊन १२१ वैदिक ब्राह्मणांचे नेतृत्व करणारे मुख्य पुजारी पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे आज सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८६ वर्षांचे होते. ही बातमी कळताच संपूर्ण देशात शोककळा पसरली. गेल्या अनेक वर्षांपासून ते अंथरुणाला खिळून होते. त्यांनी वाराणसीमध्ये शेवटचा श्वास घेतला.

दीक्षित यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला. दरम्यान, जानेवारी महिन्यात अयोध्येतील राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा पूजेत पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पूजा पूर्ण झाल्या. या पूजेत त्यांचा मुलगा आणि कुटुंबातील इतर सदस्यही सहभागी झाले होते.

तसेच डिसेंबर २०२१ मध्ये काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनाच्या पूजेतही ते सहभागी झाले होते. आज सकाळी लक्ष्मीकांत दीक्षित यांची तब्येत बिघडली आणि त्यांनी वाराणसीमध्ये शेवटचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR