16.3 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्ररावसाहेब दानवेंच्या मुलीच्या गाडीला अपघात

रावसाहेब दानवेंच्या मुलीच्या गाडीला अपघात

छत्रपती संभाजी नगर: प्रतिनिधी
भाजपचे ज्येष्ठ नेते तथ माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मुलीच्या गाडीला अपघात झाला आहे. कन्नडच्या माजी जिल्हा परिषद सदस्य संजना जाधव या कन्नड-सोयगाव मतदारसंघातील नियोजित दौ-यावर निघाल्या होत्या. त्यांची गाडी धुळे-सोलापूर हायवेवर असताना एका पिक-अपने त्यांच्या गाडीला धडक दिली.

दरम्यान, भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या चाळीसगावमार्गे रांजणगावकडे निघाले होते. रांजणगाव फाट्यावर संजना जाधव यांच्या गाडीचा व पिक-अप गाडीचा अपघात झाला. या अपघातामध्ये संजना जाधव आणि गाडीतील सर्वजण सुखरुप आहेत. गाडीच्या एका बाजूला धडक बसली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR