22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयराष्ट्रपती भवनातील दरबार, अशोक हॉलचे नामांतर

राष्ट्रपती भवनातील दरबार, अशोक हॉलचे नामांतर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल आणि अशोक हॉलच्या नावात बदल करण्यात आला आहे. यापुढे दरबार हॉल गणतंत्र मंडप आणि अशोक हॉल अशोक मंडप म्हणून ओळखला जाणार आहे. नाव बदलल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आनंद व्यक्त केला. राष्ट्रपती भवनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली. अलीकडच्या काळात अनेक मोठ्या इमारती आणि रस्त्यांची नावेही बदलण्यात आली आहेत.

राष्ट्रपती भवन भारताच्या राष्ट्रपतींचे कार्यालय आणि निवासस्थान राष्ट्राचे प्रतिक आणि जनतेची अमूल्य वास्तू आहे. ही व्यवस्था अधिक सुलभ बनविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यात राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक मूल्य आणि लोकांचे प्रतिबिंब अधिक ठळकपणे दिसावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रपती भवनाच्या वतीने सांगण्यात आले. दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय पुरस्कारांचे सादरीकरण यासारखे महत्त्वाचे समारंभ आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे या नावात बदल करण्यात आला.

दरबार हा शब्द भारतीय राज्यकर्ते आणि ब्रिटिशांच्या दरबारी आणि मेळाव्यांशी संबंधित आहे, जिथे ते त्यांचे कार्य आयोजित केले जात असे. भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर त्याची प्रासंगिकता गमावली, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. प्रजासत्ताक ही संकल्पना भारतीय समाजात प्राचीन काळापासून खोलवर रुजलेली आहे. त्यामुळे दरबार हॉलचे गणतंत्र मंडप हे नाव अगदी समर्पक आहे, असे शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

अशोक हॉलचे नाव बदलण्याच्या निर्णयावर सरकारने म्हटले की, अशोक मंडप या नावामुळे भाषेत एकरूपता येते आणि अँग्लिसीकरणाच्या खुणा दूर होतात आणि त्याच वेळी अशोक या शब्दाशी संबंधित मूळ मूल्ये जपतात. अशोक या शब्दाचा अर्थ सर्व दु:खांपासून मुक्त किंवा कोणत्याही दु:खाशी संबंधित नसलेली व्यक्ती असा होतो. यासोबतच अशोक म्हणजे सम्राट अशोक, सारनाथची सिंहाची राजधानी आहे. एकता आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाचे प्रतीक हा शब्द अशोक वृक्षालादेखील सूचित करतो, ज्याला भारतीय धार्मिक परंपरा तसेच कला आणि संस्कृतीत खूप महत्त्व आहे. त्यामुळे अशोक नाव कायम ठेवण्यात आले असून, त्याला मंडप अशी जोड देण्यात आली आहे.

प्रियांका गांधींचा हल्लाबोल
दरबार हॉलचे नाव बदलल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरबारची संकल्पना नाही तर शहेनशहाची संकल्पना आहे, अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR