27.6 C
Latur
Friday, June 13, 2025
Homeलातूरराष्ट्रीय चिकित्सक दिनानिमित्त रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन 

राष्ट्रीय चिकित्सक दिनानिमित्त रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन 

लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय  शल्य चिकित्सक दिनानिमित्त सर्जिकल सोसायटी लातूरच्या वतीने विविध समाज उपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जनजागृती रॅली, रक्तदान शिबिर, नेत्रदान, देहदान, अवयवदान  आदी बाबत समाज प्रबोधन आदींचा समावेश आहे. राष्ट्रीय सर्जन सप्ताह निमित्त विविध ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. येत्या १३ तारखेस गुगळे हॉस्पिटल व १४ तारखेस डॉक्टर भालचंद्र रक्तपेढी येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा असून जागतिक रक्तदान दिनानिमित्त १४ जून रोजी बीडीजीएमसी भालचंद्र ब्लड बँक संजीवनी ब्लड बँक अर्पण ब्लड बँक माऊली ब्लड बँक लातूर ब्लड बँक गांधी चौक आदी ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय शल्य चिकित्सक दिनानिमित्त लातूर सर्जिकल सोसायटीच्या वतीने राष्ट्रीय शल्य चिकित्सक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाची सुरुवात जनजागृती रॅलीने करण्यात आली.  देशीकेंद्र विद्यालयापासून निघालेल्या या रॅली पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे यांनी हिरवी झेंडी दाखवा उद्घाटन केले. अशोक हॉटेल मार्गे मुख्य रस्त्यावरून गांधी चौकात येऊन तेथे हि रॅली विसर्जित झाली. यावेळी विविध डॉक्टर्स व विद्यार्थ्यांच्या हातामध्ये जनजागृती करणारे फलक दिसून येत होते.
यावेळी डॉ. दीपक गुगळे, डॉ. अशोक  पुनपाळे, डॉ. विठ्ठल लहाने यांनी जनजागृती संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. योगानंद गडगे, सचिव डॉ. निखिल काळे, उपाध्यक्ष डॉ. अभिजीत रायते, डॉ.दीपक गुगळे, डॉ. हंसराज  बाहेती, डॉ. विठ्ठल लहाने, डॉ. मेघराज  चावडा, डॉ. हनुमंत किनीकर, डॉ. अजय  पुनपाळे, डॉ. रवी इरपतगिरे, डॉ. पुष्पराज बिराजदार, डॉ. प्रमोद लोकरे, डॉ. नितीन बर्डे, डॉ. सागर कळवले, डॉ. संदीप जाधव, डॉ. नितीन  सर्जे, डॉ. गणेश असावा, डॉ. अभय देशपांडे आदींचे प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR