26.3 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या मुलीवर शिक्षकाकडून बलात्कार

राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या मुलीवर शिक्षकाकडून बलात्कार

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या १३ वर्षीय मुलीवर शिक्षकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. आरोपीने या मुलीला रेल्वे स्टेशन येथील हॉटेलच्या रूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी आरोपी शिवाजी जगन्नाथ गोरडेविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत पैठण शहरातील वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची राष्ट्रीय स्तरावर खो-खो खेळासाठी निवड झाली आहे. या मुलीला ती राहत असलेल्या गावातील शिवाजी जगन्नाथ गोरडे ही व्यक्ती खो-खोची ट्रेनिंग देतो. या मुलीला खो-खोच्या शिक्षकाने मुंबईला ट्रेनिंगसाठी जायचे असल्याचे सांगितले. त्याने तिला आपल्याला रात्रीच्या १० च्या ट्रेनने मुंबईला जायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार पीडित मुलगी रेल्वे स्टेशनला गेली. आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला संभाजीनगर रेल्वे स्टेशन रोडवरील हॉटेल पंजाबमध्ये नेले. त्याठिकाणी त्याने एका खोलीमध्ये नेऊन मला तू खूप आवडते असे म्हणत पीडित मुलीवर जबरदस्ती केली आणि बलात्कार केला.

त्यानंतर आरोपी शिवाजी पीडित मुलगी शिकत असलेल्या शाळेत गेला आणि तिला माझ्यासोबत चल असे म्हणाला. पीडित मुलीने नकार दिला असता तुझ्यासोबत मी जे केले ते मी संपूर्ण गावभर सांगून तुझी बदनामी करेल असे सांगितले. वारंवार आरोपी पीडित मुलीला धमकी देत होता. या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने आईसोबत पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR