29.2 C
Latur
Saturday, June 29, 2024
Homeराष्ट्रीयराहुल गांधी हे गांधी घराण्यातील तिसरे विरोधी पक्षनेते

राहुल गांधी हे गांधी घराण्यातील तिसरे विरोधी पक्षनेते

१० वर्षांनंतर प्रथमच विरोधी पक्षनेतेपद
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. या अगोदर वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि आई सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षाचे नेते म्हणून काम केले. त्यामुळे राहुल गांधी हे गांधी घराण्यातील तिसरे विरोधी पक्षनेते ठरले आहेत. आता ते विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा चेहरा म्हणून पुढे येतील. त्यांच्यावर प्रथमच विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली आहे. कारण गेल्या १० वर्षांत विरोधी पक्षनेतेपद अस्तित्वात नव्हते.

विरोधी पक्षनेते असल्याने आता देशातील महत्त्वाच्या नियुक्त्यांमध्ये त्यांचे मत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे राहुल गांधी आता विरोधकांचा चेहरा असतील. राहुल गांधी यांनी संसदेत पहिल्यांदाच एवढी मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. २००४ पासून राहुल गांधी हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. आता विरोधी पक्षनेतेपदी विराजमान होणारे राहुल गांधी हे गांधी घराण्यातील तिसरे व्यक्ती ठरणार आहेत. याआधी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी व्हीपी सिंह यांच्या सरकारच्या काळात विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली होती. आता मोदी सरकारच्या तिस-या कार्यकाळात राहुल गांधी विरोधी पक्षनेते बनले आहेत.

कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळणार आहे. त्यांना संसदेत कार्यालय आणि कर्मचारीही असतील. विरोधी पक्षनेते बनताच राहुल गांधी बदललेल्या शैलीत दिसले. गेल्या काही वर्षांत ते अनेकदा पांढरा टी-शर्ट आणि पँटमध्ये दिसत होते. पण आज ते संसदेत कुर्ता-पायजामा घालून दिसले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR