मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी निकाल दिला. शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचाच असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. त्याशिवाय त्यांनी कोणत्याही आमदारांना अपात्र केले नाही. यावर उद्धव ठाकरे यांच्याकडून जोरदार टीका करण्यात आली.
पण सत्ताधारी भाजपकडून राहुल नार्वेकर यांच्या निकालाचे स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल नार्वेकर यांचे स्वागत केले. त्याशिवाय त्यांनी योग्य निकाल दिल्याचेही ते म्हणाले. आमचे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.