26.6 C
Latur
Friday, June 28, 2024
Homeलातूररेणापूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

रेणापूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

रेणापूर : प्रतिनिधी
सर्व सामान्य जनतेला वेटीस धरून जाणीवपूर्वक त्रास देणारे व अवैध धंद्याना पाठबळ देणारे रेणापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना तात्काळ निलंबीत करावे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी रेणापूर तालुक्याच्या वतीने सोमवारी दि २४ जून रोजी पोलीस ठाण्यासमोर तालुकाध्यक्ष अ‍ॅड दशरथ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जोपर्यंत निलंबनाची कार्यवाही होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे यांची तडका फडकी मुख्यालयात बदली करण्यात आली.
रेणापूर पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे यांनी पद्भार घेतल्यापासून तालुक्यात  हातभट्टी दारुवाल्याशी, मटका व  जुगार व्यवसायकांशी संपर्क साधून स्वत: चे  खिसे भरण्याचे काम केले तसेच या व्यवसायीकांना वेळोवेळी प्रोत्साहन दिल्याने अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले. जे अवैध व्यवसाईक ठराविक  चिरीमिरी देणार नाहीत अशाना दंडूक्याचा धाक दाखवून अधिकची चिरीमिरी घेऊन साथ देण्याचा प्रकार सर्रास सुरू होता. अवैद्य धंद्यामुळे गावा-गावात मारामारीचे  प्रकार वाढले आहेत. त्या बरोबरच काही खब-यांना हाताशी धरून वाळू वाहतूक करणारा टॅक्टर असो की शेतक-याचा शेती माल व जनावरे घेऊन वाहन असो अशा वाहनाना आडवुन दमदाटी करून त्यांच्याकडून मोठ्या रक्कमा उकळण्याचा प्रताप पोलीस निरीक्षक अनंत्रे यांनी केला.
किरकोळ वादाच्या प्रकरणातही अर्ज देणा-याकडून व ज्यांच्या विरुद्ध अर्ज दिला त्यांच्याकडून ही पैसे घेण्याचा पराक्रम अनंत्रे यांनी केला असा अरोप करीत पोलिस निरिक्षक अनंत्रे यांना निलंबीत करण्यात यावे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी रेणापूर तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष अँड दशरथ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दि २४ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून पोलीस ठाण्यासमोर  ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी पोलिस उपाधीक्षक गजानन भातलंवडे यांनी आंदोलनस्थळी येऊन आपल्या मागणी संदर्भात कार्यवाही करण्यात येईल. तुम्ही आंदोलन मागे घ्या अशी विनंती केली मात्र  आंदोलकांनी जोपर्यंत निलंबनाची कार्यवाही होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक यांची तडका फडकी मुख्यालयात बदली करण्यात आली .
  या आंदोलनात भाजपाचे अनिल भिसे, वसंत करमुडे, अभिषेक आकनगिरे, अमर चव्हाण शरद दरेकर, अच्युत कातळे, संतोष तूरूप, श्रीकृष्ण पवार, शरद राऊतराव, उज्वल कांबळे, उत्तम चव्हाण, अनुसया फड, शीला आचार्य, शिवमुर्ती ऊरगुंडे, सोमनाथ चिल्लरगे, विजय चव्हाण, वाजिद सय्यद, शालिक गोडभरले, विठ्ठल कस्पटे, संतोष राठोड, प्रल्हाद फुलारी, चंद्रकांत आलापुरे, हनुमंत भालेराव, प्रताप भुरे, राजकुमार मानमोडे, शिवाजी जाधव, दिलीप चव्हाण, बलभीम जाधव, रानबा मुळे शेख जलील, दिलीप पाटील, नरंिसग येलगटे, जयप्रकाश जटाळ, पृथ्वीराज उरगुंडे, ओम चप्पे, लखन आवळे, रमा चव्हाण, गणेश चव्हाण, अमरदीप माने, राजू आतार, नरंिसग चपटे, ओम चव्हाण, बाळू पाटील, लक्ष्मण खलंग्रे, योगेश पनगुले, ऋषिकेश गायकवाड, पंकज काळे, सदाशिव राठोड, अनिकेत बुडडे, आकाश चव्हाण महादेव माने यांच्यासह तालुक्यातील शेकडो भाजपाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR