22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeलातूररेणापूर येथील महाऑनलाईनचे सर्व्हर ठप्प

रेणापूर येथील महाऑनलाईनचे सर्व्हर ठप्प

रेणापूर : प्रतिनिधी
महा-ई सेवा सुविधा आणि आपले सरकार सेवा केंद्रांत विद्यार्थी आणि लाभार्थीची अपलोड केलेली हजारो प्रमाणपत्रे गेल्या काही दिवसापसून महाऑनलाइनच्या  सर्व्हर ठप्पमुळे मिळणे कठीण  झाले आहे. यामुळे विद्यार्थी व नागरीकांची प्रचंड गैरसोय होत आहे . दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल लागताच पुढील प्रवेशासाठी अत्यावश्यक प्रमाणपत्रे काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी जवळच्या महा-ई-सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्रात अर्ज दाखल केले होते ते येण्याची वाट पाहत असतानाच शासनाने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ घोषित केली.
त्यात पहल्यिा घोषणेनुसार उत्पन्न, रहिवासी, अधिवास प्रमाणपत्र आदींची आवश्यकता असल्याचे नमूद केल्यामुळे हजारो महिलांनी राज्यात अर्ज दाखत केले. त्यामुळे सर्व्हरवर लोड येऊन  तहसीलच्या ‘ऑनलाईन डेस्क क्रमांक एक वरून संचिका पुढे जाणे थांबून गेले.  दरम्यान सर्व्हवर चार ते पाच पटीने काम सुरू असल्यामुळे सर्व्हर  चालत नाही. सर्व्हर सुरळीत होताच विद्यार्थी व नागरीकांना ऑनलाईन दाखले प्रमाणपत्र दिली जातील, असे नायब तहसीलदार श्रावण उगले यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR