रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासह सर्व प्रभागातील उमेदवार हे चारित्र्य संपन्न व जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले उमेदवार दिले आहेत. निवडणूक प्रचारामध्ये काँग्रेस पक्षाने आघाडी घेतली असून जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास रेणापूरकर व्यक्त करीत आहेत.
२४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रभाग क्रमांक ४ चक्रे अजयकुमार भिवा, प्रभाग. क्र . ५ भोकरे गोविंद प्रभू, प्रभाग क्र . ६ कातळे शितल अतुल व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माने अर्चना प्रदीप यांनी प्रभागातील प्रत्येक घरात जाऊन मतदारांच्या भेटी घेत संवाद साधला. काँग्रेस पक्ष हा विकासाचे राजकारण करणारा व जनतेचे प्रश्न सोडविणारा पक्ष असल्यामुळे २ डिसेंबर २०२५ रोजी होणा-या मतदानात प्रचंड मतांनी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक पदाच्या व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारास निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, पक्षनिरीक्षक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

