रेणापूर : प्रतिनिधी
आगामी होऊ घातलेल्या रेणापूर नगर पंचायत निवडणुकीच्या अनुषांगाने जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप यादीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी करून मतदारात संभ्रम निर्माण केला गेला असून सदर यादी रद्द करण्यात यावी किंवा आक्षेप घेण्याची मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी रेणापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी लातूर व राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे .
अगामी होऊ घातलेल्या २०२५ च्या रेणापूर नगर पंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार नगराध्यक्ष पदाचे आरक्षण , प्रभाग निहाय सदस्य पदाचे आरक्षण जाहीर झाले तर प्रभाग निहाय मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध केली गेली आहे. सदर यादी मध्ये येथील काही पुढा-यांनी स्वताची सोय व्हावी म्हणून मुळात ज्या प्रभागात मतदार राहात त्यात त्यांचे नाव मतदार यादीत न येता ते इतर प्रभागात घेतली गेली आहेत जवळपास येथील १७ ही प्रभागात असा प्रकार झाला आहे विशेष प्रत्येक प्रभागात २०० ते ३०० मतदारांची नावे प्रारूप यादीत घेतले आहेत . त्यामुळे मतदारात गोंधळाचे व सम्रंभाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तेव्हा ज्या प्रभागात मतदार राहतात त्याच प्रभागातील प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात यावीत. रेणापूर नागर पंच्यायातीची २०१६ मध्ये प्रभाग रचना करून प्रभागनिहाय मतदारयादी प्रसिध्द होऊन शांततेत निवडणुका पार पडल्या परंतु २०२५ च्या नगर पंचायत निवडणूक प्रभाग निहाय मतदार यादीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, राज्य निवडणूक आयोग यांना दिल्या असून निवेदनावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालाजी कदम, शहराध्यक्ष मुसाभाई शेख, ‘ संदीपान देशमुख’, बाळासाहेब पटनुरे, अशोक काळे, नानासाहेब काळे, निखिल कातळे, विपूल तपघाले आदींच्या स्वाक्ष-या आहेत.