रेशनकार्डधारकांना दिवाळीपूर्वी साखर, डाळ अन् खाद्यतेलही मिळणार स्वस्त!…

 

मुंबई : प्रतिनिधी
यंदा दिवाळी सणासाठी शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ वाटण्याऐवजी बाजारापेक्षा कमी दरात साखर, डाळ व खाद्यतेल वाटप करण्याची योजना महायुती सरकारकडून आखली जात आहे. यासाठी आसाम सरकारने राबवलेल्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास महाराष्ट्रात सुरू असून येत्या दिवाळी सणापर्यंत यावर आंमलबजावणी करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे.
राज्यात महायुती सरकारने गेल्या २-३ वर्षांत सरकारने आनंदाचा शिधा योजनेतून १०० रुपयांत १ किलो रवा, १ किलो साखर, १ किलो चणा डाळ, १ किलो खाद्यतेल दिले होते. आता या सर्व पदार्थांचे भाव वाढले आहेत. साखरच ५५ ते ६० रुपये किलो झाली आहे. म्हणून तीन पदार्थ बाजारापेक्षा स्वस्त दरात देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

अर्थात स्वस्त किंवा कमी दर म्हणजे बाजारापेक्षा किती स्वस्तात पदार्थ वाटप होतील, हे अद्याप ठरलेले नाही.आसाममध्ये डाळ, साखर आणि मीठ अनुदानित दरात दिल्या जातात. याचा अभ्यास करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून विभागीय स्तरावर काम सुरू झाले आहे. ही योजना दिवाळीसाठी महाराष्ट्रात कशी लागू करता येईल, याचा अभ्यास केला जाणार आहे.

१ शिधापत्रिकाधारक म्हणजे दारिर्द्यरेषेवरील परंतु निम्न मध्यमवर्गीय कुटुंब आहे. २ ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. १५,००० ते रु. १,००,००० रुपयापर्यंत आहे, त्यांना केशरी शिधापत्रिका मिळते. 3 कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर चारचाकी नसेल किंवा बागायती जमीन निश्चित मर्यादेपेक्षा जास्त नसेल त्यांना केशरी शिधापत्रिका मिळते. ४ या शिधापत्रिकाधारकांना शासनाच्या निकषांनुसार सवलतीच्या दरात काही ठराविक अन्नधान्याचा लाभ मिळतो. ५ महाराष्ट्रात सुमारे १ कोटी ८४ लाख २४ हजार केशरी शिधापत्रिकाधारक असल्याची नोंद.

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Gunratan Sadavarte LIVE : सदावर्ते जरांगेंना रोखणार? ‘चलो मुंबई’च्या घोषणेनंतर काय म्हणाले?
00:00
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20
Video thumbnail
Latur|विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक बाप्पा! लाहोटी शाळेचा अनोखा उपक्रम
02:34
Video thumbnail
Latur|पक्ष बाजूला ठेवा,संकटातून मार्ग काढू!लातूरच्या दुष्काळावर संभाजी पाटील निलंगेकरांचा मोठा प्लॅन
04:53
Video thumbnail
Latur|MPSC विद्यार्थ्यांच्या मोर्चात रोहित पवार! ‘अध्यक्ष-सचिवांनी राजीनामा दिलाच पाहिजे’
01:58
Video thumbnail
MPSC STUDENT PROTEST|MPSC विद्यार्थ्यांचा लातुरात आक्रोश;पेपरफुटी विरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर
03:44
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
10:07
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46

Latest news