27.6 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeलातूररोजा माणसाच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवितो 

रोजा माणसाच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवितो 

लातूर : प्रतिनिधी
पवित्र रमजान महिन्यात रोजा ठेवल्यामुळे केवळ शरीराचीच नव्हे तर मनाचीही शुद्धी होते. रोजामुळे वाईट विचारांचा -हास होऊन माणसाच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घूगे यांनी केले.  शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील नगसवेक इसरार सगरे मित्र मंडळाच्या वतीने दि. ९ मार्च रोजी येथील कायमखानी सभागृहात आयोजित इफ्तार कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
 यावेळी महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर अ‍ॅड. स्नेहल उटगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, मनपा आयुक्त श्रीमती मानसी, उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे, दिशा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक अभिजित देशमुख, अ‍ॅड. किरण जाधव, विजयकुमार साबदे, अ‍ॅड. समद पटेल, जमियत उलेमा-ए-हिंदचे जिल्हाध्यक्ष मौलाना ईस्त्राइल रशिदी, सत्तार शेख, नगरसेविका सपना किसवे, तब्बसूम शेख, योगेश स्वामी, सचिन बंडापल्ले, युनूस मोमीन, आतिष चिकटे, अशोक गोविंदपूरकर, डॉ. चेतन सारडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मौलाना ईस्त्राइल रशिदी यांनी देशात शांतता, समता आणि बंधुभाव वाढावा तसेच रमजान महिन्यात झालेल्या चुकांसाठी क्ष्मा मिळावी, अशी प्रार्थना केली. प्रास्ताविक नगरसेवक इसरार सगरे यांनी केले. सुत्रसंचालन अब्दुल गालिब शेख यांनी केले. तर इंजि. मुख्तार शेख यांनी आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR