22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूररोटरी क्लबच्या वतीने २३ शाळांना कपाट,पुस्तके वितरण 

रोटरी क्लबच्या वतीने २३ शाळांना कपाट,पुस्तके वितरण 

चाकूर : प्रतिनिधी
चाकूर रोटरी क्लब च्या वतीने रोटरी की पाठशाळा अंतर्गत तालुक्यातील २३ जिल्हा परिषद व खाजगी शाळात ग्रंथालयासाठी लोखंडी कपाट व पुस्तके वितरण व कर्तृत्ववान व्यक्तींना व्होकेशनल अवार्ड वितरण कार्यक्रम गुरुवारी दि.८ रोजी येथील विश्वशांतीधाम मंदिर येथे झाला.
उद्घाटक म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी नमन गोयल, सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेडी ,तहसीलदार रेणुकादास देवणीकर, गटशिक्षणाधिकारी जयंिसह जगताप ,रोटरी क्लबचे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे, सचिव विश्वनाथ एडके, क्लब ट्रेझरर डॉ. चंद्रप्रकाश नागिमे ,क्लब ट्रेनर डॉ.संजय स्वामी, वोकेशनल डायरेक्टर संजय कस्तुरे ,लिटरसी डायरेक्टर विनोद निला, प्रोजेक्ट चेअरमन बालाजी उमाटे हे  उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. बी.चंद्रकांत रेड्डी यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला,तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी रोटरी क्लबकडून होत असलेल्या कामाचे कौतुक केले. गट शिक्षण अधिकारी जयंिसग देशमुख यांनी उपस्थित मुख्याध्यापक ,शक्षिक यांना रोटरी क्लब देत असलेले कपाट व पुस्तकाची नोंद रोटरीच्या नावाने नोंद ठेवण्याची सूचना केली. लिटरसी डायरेक्टर विनोद नीला यांनी माहिती दिली. प्रास्ताविक रोटरीचे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश हाके यांनी केले. आभार रोटरी क्लबचे सचिव विश्वनाथ एडके यांनी मानले. यावेळी इनरव्हील क्लबच्या संस्थापक अध्यक्षा डॉ अंजली स्वामी, सचिव सुमन पवार, मीनाताई हाके, सुषमा मुळे, रो.दिलीप शेटे, शैलेश पाटील, शिवदर्शन स्वामी, सुधाकर हेमनर, अमोल येरवे, शाळेचे विद्यार्थी मुख्याध्यापक ,शिक्षक उपस्थित होते.
यावर्षीचा रोटरी इंटरनॅशनलचा व्होकेशनल अवार्ड देऊन कडमुळी येथील उत्तमराव जाधव आणि हानंमतवाडी येथील नामदेव नरवटे या दोघांच्या समाज उपयोगी सेवाकार्याचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले. कडमुळी येथील उत्तमराव जाधव यांनी येथील साईनंदनवनमच्या माध्यमातून जिथे शेती करणे कठीण होते तिथे केशर आंब्याची लागवड करून नंदनवन निर्माण केले. तसेच आध्यात्मिक शिवालयाची निर्र्मिती केली.तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यांसाठी वृंदावन अम्युजमेंट गार्डन आणि वॉटर पार्कची निर्मिती केली.उत्तमराव जाधव यांचा सन्मान विशाल जाधव यांनी स्वीकारला.तर हानंमतवाडी येथील नामदेव नरवटे यांनी शेतीपूरक व्यवसाय करीत कुपनलिकेतील पडलेल्या आणि अडकलेले विद्युत पंप काढण्याचे काम कौशल्याने गेल्या अनेक वर्षापासुन करून शेतक-यांना दिलासा देण्यांचे काम केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR