18.7 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्ररोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली

रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली

अहिल्यानगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम मशिनवर आरोप केले जात आहेत. आता अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएमविरोधात पहिले आंदोलन करण्यात आले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे महाविकास आघाडीच्या वतीने ईव्हीएम मशिनची प्रतिकृती जाळण्यात आली. पाथर्डी तहसील कार्यालयासमोर रोहित पवार आणि प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांसह ईव्हीएम मशिनचे दहन करण्यात आले. ईव्हीएम मशिनविरोधातील राज्यातील हे पहिलेच आंदोलन नगरमध्ये पार पडले असून महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली आहे.

रोहित पवार म्हणाले की, पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघात प्रताप ढाकणे, त्यांचे कार्यकर्ते आणि मतदारांनी इच्छा व्यक्त केली होती. लोकांची भावना प्रताप ढाकणे यांच्या बाजूने होती, ते आमदार झाले पाहिजेत ही जनतेची इच्छा होती.

या मतदारसंघाचे वातावरण राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बाजूने होते. लोकांनी ही निवडणुकीत हाती घेतली होती. प्रताप ढाकणे आमदार बनावे यासाठी जनतेने कष्ट घेतले होती. मात्र या मतदारसंघातील निकाल येथील जनतेला मान्य नाही. त्यामुळे आम्ही आज येथील तहसील कार्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात ईव्हीएम मशिनची होळी केली. सामान्य लोकांना आता ईव्हीएमवर शंका वाटत आहे. ही शंका वाटणे लोकशाहीत योग्य नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR