25.4 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeमहाराष्ट्रलक्ष्मण हाके यांनी मद्य प्राशन केले नाही

लक्ष्मण हाके यांनी मद्य प्राशन केले नाही

वैद्यकीय चाचणी अहवालातून स्पष्ट

पुणे : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मद्य प्राशन केल्याचा आरोप करीत त्यांना सोमवारी रात्री जमावाकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. दरम्यान, हाके यांनी मद्य प्राशन केले नसल्याचा वैद्यकीय अहवाल ससून रुग्णालयाकडून प्राप्त झाला आहे. तसेच, या प्रकरणी २० ते २५ मराठा आंदोलकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

हाके यांनी काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून काही तरुणांनी सोमवारी त्यांना जाब विचारला. या वेळी काही तरुणांनी हाके यांनी मद्य प्राशन केल्याचा आरोप केला.

त्यावरून कोंढवा पोलिस ठाण्याच्या आवारात मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत गोंधळ सुरू होता. मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत हाके यांच्या वैद्यकीय चाचणीची मागणी केली होती. त्यावर ‘‘मी मद्यसेवन केलेले नाही. मी कोणतीही वैद्यकीय चाचणी करण्यास तयार आहे. हा कट पूर्वनियोजित होता. मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असे हाके यांनी म्हटले होते.

दरम्यान बेकायदेशीर जमाव जमवून धक्काबुक्की केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ससून रुग्णालयात हाके यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्या अहवालानुसार हाके यांनी मद्य प्राशन केलेले नाही. याबाबत न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही असे पोलिस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR