नागपूर : प्रतिनिधी
राज्यातली लाडकी बहिणच काय, कुठलीही योजना बंद होणार नाही. शिव भोजन असो की लाडकी बहीण…काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने त्या योजनेचा फायदा घेतला. त्या व्याख्येत जे लाभार्थी बसत नाहीत ते कमी करावेच लागणार आहेत. सरकार कुठलीही योजना बंद करणार नाही असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
विकसित महाराष्ट्रासाठी सोबत या. आमच्यासोबत काम करा आणि महाराष्ट्राला पुढे न्या. या भूमिकेतून आम्ही काम करत आहोत. त्यासाठी एक कोटी १६ लाख लोकांनी भाजपची प्राथमिक सदस्यता घेतली आहे. कार्यकारी अध्यक्ष रवी चव्हाण आणि मी आम्ही दोघे मिळून काम करत आहोत.
मोठा पक्ष म्हणून आम्ही काम करत आहे. आमचे महायुतीचे आणि भाजपचे मंत्री संपर्क मंत्री त्या-त्या जिल्ह्यात जाऊन जनतेच्या अपेक्षा जाणून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांच्यावर दबाव संदर्भात छेडले असता, मुळात आम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही. भाजपची ही पद्धती नाही. आम्ही विकसित महाराष्ट्राचा संकल्प घेतला. त्या पद्धतीने महाराष्ट्र पुढे नेणार आहे. या संकल्पनेला साथ देण्यासाठी अनेक लोक पक्ष प्रवेश करतात. आमच्या पक्षात या असे आम्ही कधी कोणाला म्हणत नाही. ज्यांना वाटते भाजपमध्ये गेले पाहिजे. आम्ही त्या लोकांचे स्वागत करतो. आमची महायुती अत्यंत मजबूत आहे. आपापला पक्ष वाढवून इतर स्पेस आहे, तर इतरांना घेणे हे आमचे काम आहे. आम्ही महायुती एकत्रित विधानसभा लढली, लोकसभेत लढली. पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुतीचा लढण्याचा विचार असल्याचे एका प्रश्नाचे उत्तरात सांगितले.