20.2 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्रलाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता बँक खात्यात जमा

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता बँक खात्यात जमा

नागपूर : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता जमा करण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. २५) नागपूरमध्ये बोलताना दिली. त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच वर्ग केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यानुसार १,५०० रुपये देण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे महिला वर्गाला नववर्षाची भेट मिळाली आहे. डिसेंबरच्या हप्त्यासाठी सरकारने ३,५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेचा सहावा हप्ता हा १,५०० रुपयेप्रमाणेच जमा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या निवडीवरून फडणवीस यांनी, गडचिरोलीचे पालकमंत्रिपद मी स्वत:कडे ठेवणार असल्याचे सांगितले.
लोकसभेत फेक नॅरेटिव्ह सेट केले होते. त्यास आम्ही उत्तर देऊ शकलो. विधानसभेत मोठे बहुमत जनतेने आम्हाला दिले. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. कोणतेही बहुमत जनतेच्या अपेक्षा घेऊन येत असतात. अनेकदा अडचणी आणि मर्यादा असतात. या सर्वावर मात करून आपल्या मनातील महाराष्ट्र घडवायचा आहे. २०१४ मध्ये आपले सरकार आल्यावर हा नवखा आहे याला काय जमणार? असे सवाल उपस्थित करण्यात आले.

सतत विदर्भावर बोलणारा हा व्यक्ती पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करेल का? पण विदर्भासह इतर कुठेही मी अन्याय होऊ दिला नाही. महाराष्ट्रात आतापर्यंत विक्रमी जनादेश भाजपला मिळाला. विदर्भात खूप काम आम्ही केले. त्याचवेळी महाराष्ट्राच्या कुठल्याच भागावर आपण अन्याय होऊ दिला नाही. ८० प्रकल्प पूर्ण केले. वर्षानुवर्षे रखडलेले पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील प्रकल्प पूर्ण केले, असे फडणवीस म्हणाले. या संधीचे सोने करेन. सत्ता डोक्यात जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ऊर्जा विभागात पुढील पंचवीस वर्षांचा रोड मॅप आम्ही तयार केला आहे. सिंचनमध्ये ६ जोड प्रकल्पांची कामे हाती घेतली आहेत. गडचिरोली क्षेत्र बदलण्याचे काम आपण करू. विदर्भाला औद्योगिक विको सिस्टीम करू, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

सगळ्या घरांना सोलर देणार
आम्ही चालू केलेल्या योजना सुरूच ठेवू. या योजनांचा भार अर्थसंकल्पावर पडतोय. पण त्याचे नियोजन आम्ही करतोय. केंद्राच्या माध्यमातून मोठी कामे करणार आहोत. सगळ्या घरांना सोलर देऊन त्यांना कोणतेही वीज बिल येणार नाही, असे काम आम्ही करू. नागपूरकर म्हणून आपली उंची वाढेल या दृष्टीने महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी काम करेन, असेही त्यांनी नमूद केले.

अडीच वर्षांत ‘वन डे’ची मॅच खेळलो…
आम्ही तिघेही सोबत काम करत आहोत. अडीच वर्षांच्या काळात ‘वन डे’ची मॅच खेळलो. त्यानंतर टी-२० आम्ही जिंकलो. आता मोठी मॅच आम्ही खेळू, असेही त्यांनी सांगितले.

‘ईव्हीएम’च्या मुद्यावर काय म्हणाले फडणवीस?
ईव्हीएमच्या मुद्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, निवडणूक हरल्यावर ईव्हीएमवर बोट ठेवले जाते. त्यामुळे त्यांना उत्तर उमर अब्दुल्ला आणि ममता बॅनर्जी यांनी दिले. आम्हाला उत्तर द्यायची गरज नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR