मुंबई : प्रतिनिधी
‘लाडकी बहीण योजने’च्या राज्यातील पात्र महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्य सरकारकडून दोन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती आणि लाभदायी प्रणाली समिती या दोन्ही समित्या योजनेच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत.
राज्य सरकारने राज्यभरात महिलांसाठी ‘माझी लाडकी बहीण योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. अशातच आता ‘लाडकी बहीण योजने’ची राज्यात नीट अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने आता मोठे पाऊल उचलले आहे. आता लाडकी बहीण योजनेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी राज्य सरकारने दोन समित्या स्थापन केल्या आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार योजनेच्या अंमलबजावणीबाबत पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे.
लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती आणि लाभदायी प्रणाली समिती अशी या स्थापन करण्यात आलेल्या दोन समित्यांची नावे आहेत. लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती ऊर्जा विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्य समिती गठित करण्यात आली आहे. तर लाभदायी प्रणाली समिती वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती गठित केली आहे.