मुंबई : प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू झाल्यापासून राज्यातील २ कोटी ते २.५ कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरतील असा अंदाज आहे. महिलांच्या खात्यात थेट ३ हजार रुपये पाठवण्यापूर्वी सरकार १ रुपया पाठवणार आहे. त्यामुळे महिलांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी अवघ्या २५ दिवसांत १ कोटी ८० लाखांहून अधिक अर्ज सादर झाले आहेत. यातील १ कोटी ३० लाख अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाले असून, ५० लाख अर्ज ऑफलाईन पद्धतीने प्राप्त झाले आहेत. सरकार १५०० रुपये महिना देणार होते तर खात्यात १ रुपया कसा आला, असा प्रश्न महिलांनी विचारला यावर आता महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात १ रुपया जमा करणार असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. हा १ रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अर्जांची प्रक्रिया आणि पैसे जमा होण्याची वेळ
लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी हे पैसे मिळणार आहेत. अर्ज केलेल्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात येत्या १७ ऑगस्ट २०२४ रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ३,००० रुपये जमा होणार आहेत.
अपप्रचार आणि गैरसमज यांबाबत स्पष्टीकरण
राज्यातील माता-भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला व गैरसमजाला बळी पडू नये, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर “कल्ल ढील्ल्िरल्लॅ ळङ्म र४ुे्र३३ी”ि असा पर्याय दिसत असल्यास घाबरू नये, हे म्हणजे अर्ज सबमिट झाला आहे आणि आता वरिष्ठ पातळीवर अधिकारी अर्जाची पडताळणी करतील.