लातूर : प्रतिनिधी
ओबीसी, व्हीजेएनटी, एस. बी. सी, भटके विमुक्त यांचा सर्वपक्षीय महाएल्गार जिल्हास्तरीय मेळावा आयोजन संदर्भात दि. १ सप्टेंबर रोजी संवाद बैठक राज्यातील ओबीसी नेते नवनाथजी वाघमारे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडली. या बैठकीत लवकरच विधानसभा निहाय व जिल्हास्तरीय ओबीसी महाएल्गार मेळावा आयोजन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या मेळाव्यास राज्यातील सर्व प्रमुख ओबीसी नेत्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
राज्यातील सध्याची सामजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता ओबीसी, भटके विमुक्त्त, एस. बी. सी. जाती घटकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. गाव गाड्यांमध्ये राहणारा समाज प्रचंड दडपणाखाली आहे. महाज्योती संस्थेस पुरेसा निधी मिळत नाही. विद्यार्थांना स्कॉलरशिप प्रलंबित राहिलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भविष्यात मूळ ओबीसींना प्रतिनिधित्व मिळणार नाही, अशीही भीती समाजात निर्माण झालेली आहे. यासर्व बाबींना वाचा फोडण्यासाठी महायलगार मेळाव्याचे आयोजन केले जाणार असून राज्यातील सर्वच प्रमुख ओबीसी नेत्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. यावर आजच्या बैठकीत विचार मंथन झाले. सर्वप्रथम औसा येथे हा मेळावा होणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा निहाय मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत आणि याची सांगता लातूर येथे जिल्हास्तरीय महामेळाव्यात करण्यात येणार आहे.
याप्रसंगी अॅड. गोपाळ बुरबुरे, रघुनाथ मदने, आयुब मणियार, प्रा. सुभाष भिंगे, हरिभाऊ गायकवाड, प्रा. संतोष वीरकर, राजेंद्र वनारसे, पद्माकर वाघमारे, सुधीर पोतदार, नरसिंह भिकाने, विजयकुमार पिनाटे, भारत काळे, श्रीकांत मुद्दे, सुदर्शन बोराडे, विष्णू बानापुरे, डॉ. एच. जी. निंबाळकर, अनिल जाधव, श्याम गोरे, राम कांबळे, अॅड. नितीन म्हेत्रे, कालिदास माळी, सुधाकर माळी, दगडूसाहेब पडिले, संजय क्षीरसागर, अॅड. बालाजी गाडेकर, पांडुरंग माळी, हनुमंत कांबळे, सुधाकर लोकरे, चांगदेव माळी, विनोद कुंभार, योगेश लदूरे, सतीश काप्रे, पांडुरंग बनसोडे, उद्धव काळे, भागवतचिंते, विशाल वाघमारे युवराज चव्हाण, सचिन माळी, ज्ञानोबा मोगले ,शिवाजी पेठे, प्रल्हाद गड्डीमे, भागवत वंगे, शिवाजी कुंभार, अॅड. दत्ता घोगरे, विष्णू कोळी, रणधीर हाके, विष्णु पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.