31.1 C
Latur
Sunday, June 16, 2024
Homeलातूरलातूरच्या बाजारात कोथिंबीर खातेय भाव

लातूरच्या बाजारात कोथिंबीर खातेय भाव

लातूर : प्रतिनिधी
गेल्या आठ दिवसांपुर्वी जिल्ह्याभरात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडल्याने भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या शहरातील बाजारपेठेत भाज्यांच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. हिरव्या मिरचीचा दर शंभरीच्या दिशेने झेपावत असून कोथिंबीरीने मात्र पार केली आहे. शेवगा, भेंडी, मेथी, कारल्याच्या दरातही तेजी पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे रोजच्या वापरातील कांदा, टोमॅटो दरात सातत्याने घसरण होत असल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे.
सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कोणत्याही  पदार्थाची लज्जत वाढवणारी कोथ्ािंबीर सध्या बाजारात भाव खात असून १२० रुपये किलोच्या भावाने विकली जात आहे. त्यामुळे गृहिणीचे भाजीपाल्याचे रोजचे बजेट कोलमडले आहे. शहरातील विविध भाजी बाजारात भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा मिळत असला तरी ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे. कोथिंबीर ही प्रत्येकाच्या घरात वापरलीच जाते. कांही दिवसापूर्वी बाजारात कोथींबीरीचा दर ३० ते ४० रूपये किलो होता,
पण आता याच कोथ्ािंबिरीचा दर गगनाला भिडला असून कोथ्ािंबीर प्रतिकिलो थेट १०० ते १२० रुपयांना विकली जात आहे. सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. तसेच शेतीतील उभ्या पिकांना पाणी कमी पडू लागल्याने शेतीमालावर परिणाम होत आहे. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसापासून ४० टक्के शेतमालाची आवक होत आहे.  शेतमालाची आवक घटल्याने किरकोळ बाजारात मात्र भाव तेजीत आहेत. अशातच इतर भाज्यांसह कोथिंबीरनेही दरात उच्चांक गाठला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR